सोलापूर,दि.16: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे (Dilip Kolhe) यांनी राष्ट्रवादी सोडण्याचा निर्णय घेतला होता. दिवाळीनंतर ते बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू होती. शिंदे गटाचे जिल्ह्यातील नेते व आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांची कोल्हे यांनी भेट घेतल्याने फोटो समाजमाध्यमात प्रसिध्द झाले होते. पवारनिष्ठ कोल्हे हे पक्ष सोडून जात असल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे.
सोलापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला हा मोठा धक्का मानला जात आहे. दिलीप कोल्हे हे शरद पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात.
एकनाथ शिंदे गटाने सोलापुरात शिवसेनेला धक्का दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडे आपला मोर्चा वळवला आहे. सोलापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटाने शिवसेना आणि राष्ट्रवादीला खिंडार पाडण्याचे काम सुरू केले आहे. शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते आधीच शिंदे गटात सामील झाले आहे. आता राष्ट्रवादीचे नेतेही प्रवेश करत आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमहापौर दिलीप कोल्हे आज शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी सात वाजता वर्षा निवासस्थानी प्रवेश होणार आहे. दिलीप कोल्हे हे शरद पवारांचे अत्यंत विश्वासू मानले जात होते. दिलीप कोल्हे आपल्या कार्यकर्त्यांसह आता मुंबईला निघाले आहेत. पक्षातील स्थानिक नेतृत्वांना कंटाळून दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून दिलीप कोल्हे आपल्या समर्थकांसह मुंबईला रवाना झाले आहेत.