Chhagan Bhujbal: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सरस्वती देवीवर केले वक्तव्य

Chhagan Bhujbal News: छगन भुजबळ यांनी सरवस्ती देवीच्या पूजेवर पुन्हा एकदा भाष्य केलंं आहे

0

पुणे,दि.28: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सरस्वती देवीवर वक्तव्य केले आहे. पुण्यात बोलताना आमदार छगन भुजबळ यांनी वक्तव्य केलं आहे. छगन भुजबळ यांनी सरवस्ती देवीच्या पूजेवर पुन्हा एकदा भाष्य केलंं आहे. सरस्वती देवीने किती शाळा काढल्या? किती लोकांना त्यांनी शिक्षण दिलं? जर त्यांनी शिक्षण दिलं तर मग महात्मा फुलेंना का पाऊल टाकावं लागलं? ब्राम्हण समाजात फक्त पुरुषांना शिक्षण दिलं जायचं. ते ही महिलांना शिक्षण देत नव्हते. म्हणून म्हणतो मी फक्त सरस्वतीची पूजा का? त्यामुळं सावित्रीबाई फुलेंना स्थान द्या, असं वक्तव्य छगन भुजबळांनी केलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी छत्रपतींचा, सावित्रीबाईसह अनेकांचा अपमान करत आहेत. आता रामदेव बाबादेखील महिलांबाबत भयंकर बोलले. त्यावेळी अमृता फडणवीस त्याच कार्यक्रमात उपस्थित होत्या. आज त्या म्हणाल्या की सभ्य भाषेत बोलायला हवं होतं. म्हणजे ते असभ्य भाषेत बोलले हे त्यांच्या बोलण्यावरुन सिद्ध झालं आहे. महत्वाचं म्हणजे यांना काहीही बोलण्याचा कोणी अधिकार दिला. यांचं धारिष्ट्य होतं कसं? आज छत्रपतींचं राज्य असायला हवं. मग बघा यांचं धाडस होतं का?, अशा शब्दांत त्यांनी खडसावलं आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो प्रत्येक ठिकाणी असतो याचा आम्हाला आनंद आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना स्थान आहे. त्याबाबत ही काही दुमत नाही, पण महात्मा फुलेंच्या बाबतीत असं घडत नाही. ते दुर्लक्षित असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे लवकरच भिडे वाड्याची अवस्था सुधारण्याबाबत सरकारशी चर्चा करणार आहोत. या वाड्याच्या सुधारणेसाठी सरकारकडे मागणीदेखील करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आता गणपतीचं अथर्वशीर्ष अभ्यासक्रमात आणलं. उद्या शंकर, पार्वती, तीस कोटी देवाचाही अभ्यास सुरु करा. बाकीचं शिक्षण बंद करा. हेच शिकत बसलंं कशा नोकऱ्या लागतील. हे सगळं मुद्दाम केलं जातं आहे. यांच्याविरोधात आवाज उठवावा लागेल. कोणाची परवानगी नसताना हा प्रकार सुरु आहे, असा घणाघात छगन भुजबळ यांनी केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here