मुंबई,दि.21: राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाने उमेदवारी यादी जाहीर केली आहे. तसेच एबी फॉर्मचं वाटप करण्यात आल्याचे समजते. भाजपने विधानसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून देखील 17 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. भाजपने रविवारी 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत 32 ते 35 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाऊ शकते.
यामध्ये राष्ट्रवादीच्या अनेक विद्यमान आमदारांचा समावेश आहे. आज विधानसभेसाठी इच्छूक असणाऱ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवार यांची भेट घेतली. यावेळी अजित पवार यांच्याकडून 17 जणांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यांची यादी आता समोर आली आहे.
अजित पवारांकडून एबी फॉर्मचे वाटप केले जात असून भरत गावित आणि हिरामण खोसकर यांच्यासह 15 जणांना अर्ज मिळाले आहेत.
एबी फॉर्मचे वाटप
भरत गावित
हिरामण खोसकर
राजेश विटेकर
संजय बनसोडे
चेतन तुपे
सुनील टिंगरे
दिलीप वळसे पाटील
दौलत दरोडा
राजेश पाटील
दत्तात्रय भरणे
आशुतोष काळे
हिरामण खोसकर
नरहरी झिरवळ
छगन भुजबळ
भरत गावित
बाबासाहेब पाटील
अतुल बेनके