NCB चा बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रीच्या घरावर छापा

1

मुंबई,दि.21: चित्रपट अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान  (Aryan Khan) क्रूजवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी तुरुंगात आहे. आर्यनच्या अटकेने बॉलिवूडमध्ये खळबळ माजली असताना आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी व अभिनेत्री अनन्या पांडे (Ananya Panday) एनसीबीच्या रडारवर आली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या घरावर एनसीबीने गुरुवारी छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, NCB ला क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात शाहरुखच्या मुलासोबत बॉलिवूडच्या या यंग जनरेशनमधील अभिनेत्रीचेही चॅट आढळून आले आहे. NCB च्या हाती लागलेल्या चॅटमध्ये तो या अभिनेत्रीसोबत ड्रग्जबाबत चर्चा करताना आढळले आहे. एनसीबीने ते पुरावे म्हणून न्यायालयासमोर सादर केले आहे. असेही म्हटले जात आहे की अभिनेत्री क्रूझवर उपस्थित होती आणि सुरुवातीला एनसीबीने तिला जाऊ दिले.

रिपोर्टनुसार, ज्या दिवशी आर्यनला क्रूजवरून एनसीबीने ताब्यात घेतलं. त्यादिवशी अनन्या पांडे ही सुद्धा क्रूझवरच्या त्या पार्टीत हजर होती. मात्र कथितरित्या एनसीबीने तिला जाऊ दिले होते. पण आर्यनच्या चॅटमध्ये अनन्या पांडेचं नाव आल्यानं एनसीबी अ‍ॅक्शनमोडमध्ये आली आहे. अनन्या ही आर्यनची चांगली मैत्रिण आहे. आर्यनची बहीण सुहाना खान ही सुद्धा अनन्याची बेस्ट फ्रेंड आहे.

View this post on Instagram

A post shared by Ananya 💛💫 (@ananyapanday)

शाहरुख जेलमध्ये पोहोचला तर NCB ‘मन्नत’वर दाखल

दरम्यान एकीकडे शाहरुख मुलाला भेटण्यासाठी आर्थर जेलमध्ये दाखल झाला असताना, एनसीबीची टीम शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यावर पोहोचली आहे. एनसीबीची एक टीम अभिनेता शाहरुख खानच्या मुंबईतील मन्नत या निवासस्थानी दाखल झाली. मन्नत निवासस्थानी जवळपास अर्धा तास एनसीबीची टीम उपस्थित होती. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आमचा तपास सुरू आहे, साक्षीदार आणि संशयित दोघांनाही चौकशीसाठी बोलावले जाते. मन्नतमध्ये कोणालाही चौकशीसाठी नोटीस देण्यात आलेली नाहीये. हा एक तपास प्रक्रियेचा भाग आहे.


1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here