NCB अधिकाऱ्याने सांगितले पत्राच्या आधारे समीर वानखेडे यांची चौकशी होणार की नाही?

0

दि.२६: राष्ट्रवादीचे नेते मंत्री नबाब मलिक यांनी आज NCB चे समीर वानखेडे यांच्यावर वसुलीचा आरोप केला. समीर वानखेडे पदाचा दुरुपयोग करून खंडणी गोळा करत असल्याचा आरोप नबाब मलिक यांनी केला. नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत एनसीबीच्या एका अज्ञात अधिकाऱ्याकडून पत्र आल्याचा उल्लेख केला होता. या पत्रात २६ वेगवेगळ्या केसेसची माहिती देण्यात आली आहे. हे पत्र नवाब मलिकांनी ट्वीट केलं आहे. आता या पत्रावर एनसीबीच्या (NCB) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नवाब मलिकांनी पत्रकार परिषदेत व ट्वीटरवर उल्लेख केलेल्या त्या पत्रात एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करण्यात आलं आहेत. समीर वानखेडे हे प्रसिद्धीसाठी हपापलेले अधिकारी आहेत. सतत मीडियात राहायची त्यांना सवय आहे. अनेक निष्पाप लोकांना त्यांनी ड्रग्जच्या खोट्या प्रकरणात अडकवलं आहे. खोटी प्रकरणं बनवण्यासाठी समीर वानखेडे यांनी एक स्वतंत्र टीम तयार केली होती, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. याबाबत एनसीबीचे डेप्युटी अधिकारी अशोक जैन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने निनावी पत्र दिलं आहे. त्यात समीर वानखेडेंविरोधात धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. या आरोपांनतंर एनसीबीचे डेप्युटी डायरेक्टर अशोक जैन यांनी भाष्य केलं आहे. ‘माझ्याही व्हॉट्सअॅपवर एक पत्र आलंय, या संदर्भात आम्ही योग्य ती पावलं उचलून कारवाई करु,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

काय आहेत आरोप समीर वानखेडे हे आपल्या हस्तकांकरवी ड्रग्ज खरेदी करतात. या हस्तकांमध्ये दशरथ, जमील, मोहम्मद, अफझल, नासिर, आदिल उस्मानी यांचा समावेश आहे. ड्रग्ज खरेदी करण्यासाठी सिक्रेट सर्व्हिस फंडातील किंवा छाप्यादरम्यान उकळलेला पैसा वापरला जातो, असा दावा या पत्रात केला आहे. एखाद्याच्या घरात कमी प्रमाणात ड्रग्ज सापडले तर त्याचे प्रमाण अधिक असल्याचं दाखवून जामीन मिळणार नाही अशी तजवीज केली जाते. त्यानंतर इतर अधिकारी खोटे पंचनामे करतात. हे पंचनामे एनसीबीच्या कार्यालयातच बनवले जातात, पण घटनास्थळी बनवल्याचं भासवलं जातं, असंही या पत्रात नमूद करण्यात आलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here