Nawab Malik: नवाब मलिक यांची संपत्ती ईडीने केली जप्त, ईडीची मोठी कारवाई एकूण ८ मालमत्ता जप्त

0

मुंबई,दि.१३: राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) मोठी कारवाई करण्यात आली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी मलिकांची कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊडसह ७ मालमत्ता जप्त करण्याची कारवाई ईडीनं केली आहे. मलिक यांच्यावर दाऊदशी संबधित जमीन व्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. त्याप्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती.

ईडीने नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या एकूण आठ मालमत्तांवर टाच आणली आहे. यामध्ये नवाब मलिक कुर्ल्यातील गोवावाल कंपाऊंड येथील मालमत्ता, उस्नानाबाद येथील १४७ एकरांची जमीन, मुंबईतील ३ सदनिका आणि दोन राहत्या घरांचा समावेश असल्याचे समजते. ‘ईडी’ने फेब्रुवारी महिन्यात नवाब मलिक यांना अटक केली होती.

३ फेब्रुवारी २०२२ रोजी NIA द्वारे दाखल झालेल्या गुन्ह्यातंर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. दाऊद इब्राहिमने भारत सोडल्यानंतर हसीना पारकर आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने तो गुन्हेगारी कारवाया करत होता. त्याचवेळी टायगर मेमनसंबंधित दहशतवाद्यासोबत मलिक यांनी बेकायदेशीर जमीन व्यवहार केल्याचा आरोप झाला. याच आरोपाखाली मलिकांना अटक केली. आता ईडीने कुर्ला पश्चिम येथील गोवावाला कंपाऊंड, उस्मानाबाद येथील १५० एकर जमीन, कुर्ला पश्चिमेतील ३ फ्लॅट आणि वांद्रे येथील २ सदनिका अशा एकूण ८ मालमत्ता जप्त करण्याची कारवाई केली आहे.

नवाब मलिक यांच्यावरील ही कारवाई महाविकास आघाडीसाठी आणखी एक धक्का मानला जात आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ईडीकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर, प्रताप सरनाईक, प्राजक्त तनपुरे आणि संजय राऊत यांच्या कोट्यवधींच्या संपत्तीवर टाच आणली होती. तर प्राप्तीकर विभागाने मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष यशवंत जाधव यांची मालमत्ता जप्त केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here