मुंबई,दि.10: ‘1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगार शाह वली खान आणि मोहम्म सलीम इशाक पटेल ऊर्फ सलीम पटेल यांचे नवाब मलिक व त्यांच्या कुटुंबीयांशी संबंध असून मलिक कुटुंबाच्या मालकीच्या कंपनीनं त्यांच्याकडून कोट्यवधींची जमीन कवडीमोल भावात खरेदी केली आहे,’ असा आरोप फडणवीस यांनी केला होता. देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर नवाब मलिकांनी पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना गुंडांना मोठ्या पदावर बसवलं, असा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. हत्येचा आरोप असलेल्या मुन्ना यादवला फडणवीसांनी बांधकाम कामगार मंडळावर अध्यक्ष केलं. हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो, याच्या दुसऱ्या पत्नीवर खोट्या कागदपत्रांबाबत गुन्हा दाखल होत असतांना फडणवीस मुख्यमंत्री असांना त्यांच्या कार्यालयातून फोन गेला, असाही आरोप मलिकांनी केला.
मलिकांनी यावेळी म्हटलं की, जेव्हा नोटबंदी झाली त्यावेळी खोट्या नोटा पकडले जाण्याचं प्रमाण संपूर्ण देशभरात वाढलं होतं. मात्र महाराष्ट्रातून खोट्या नोटांचं एकही प्रकरण समोर आलं नाही. 8 ऑक्टोबर 2017 मध्ये इंटेलिजन्सकडून बीकेसीमध्ये छापेमारी झाली. ज्यात 14 कोटी 56 लाखांच्या खोट्या नोटा सापडल्या. या प्रकरणाला फडणवीसांकडून दाबलं जाण्याकरता प्रयत्न झाले, असं ते म्हणाले.
8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली. तेव्हा मोदी म्हणाले, दहशतवाद खतम होईल. काळापैसा बंद होईल. बनावट नोटा संपवण्यासाठी नोटबंदी करण्यात येत आहे. नोटबंदी नंतर संपूर्ण देशात 2000 आणि 500 च्या बनावट नोटा पकडल्या गेल्या
तामिळनाडू, पंजाबत कारवाई होत होती मात्र 8 ऑक्टोबर 2017 पर्यंत महाराष्ट्रात एकही बनावट नोटा पकडण्यात आल्या नाही. कारण फडणवीसांच्या संरक्षणात राज्यात बनावट नोटांचा धंदा सुरू होता. 8 ऑक्टोबर 2017 14 कोटी 56 बनावट नोटा पकडल्या गेल्या. हे प्रकरण दाबण्यासाठी फडणवीसांनी मदत केली. बनावट नोटांचं नेक्सस दाऊद, बांगलादेश आणि पाकिस्तानपर्यंत आहे.
इमरान आलम शेख हा हाजी अराफत शेखचा लहान भाऊ. याच हाजीला फडणवीसांनी भाजपमध्ये आणले आणि अल्पसंख्याक आयोगाचा अध्यक्ष बनवले. त्याचा हा लहान भाऊ असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
हैदर आझम बांगलादेशी लोकांना मुंबईत वसवण्याचं काम करतो. त्याची दुसरी बायको बांगलादेशी आहे. त्या व्यक्तीला फडणवीस यांनी मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचा अध्यक्ष कसा बनवला? असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला.
फडणवीसांनी पूर्णपणे राजकारणाचे गुन्हेगारीकरण केले होते. रियाझ भाटी कोण आहे? हा बनावट पासपोर्ट प्रकरणात पकडला गेला होता. दाऊद आणि इतर टोळ्यांशी ह्याचे संबंध असल्याचं सर्वांना माहीत होतं. दोन पासपोर्टसह हा पकडला जाऊनही दोन दिवसांत सुटला. हा भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमात आणि फडणवीसांच्या डिनर टेबलवर दिसायचा असा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिकांनी म्हटलं की, 2005 साली मी मंत्रीपदावर नव्हतो. सलीम पटेलचा मृत्यू झालाय ही माहिती मला 5 महिन्यांपूर्वी मिळाली आहे. सलीम पटेलचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याच्या बातम्यांवरुन सलीम पटेलनं त्यावेळी अनेक माध्यमांवर डिफमेशन दाखल केले होते, असं मलिक म्हणाले.