“नवाब मलिक ट्विट करायला मोकळे पण…” : उच्च न्यायालयाने मानहानी दावा फेटाळला

0

मुंबई,दि.22: राष्ट्रवादीचे नेते राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांनी एनसीबीचे समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्याविरुद्ध आरोपांची मालिका सुरू केली आहे. समीर वानखेडे मुस्लिम (muslim) असल्याचा दावाही मलिक यांनी केला आहे. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे (Dnyaneshwar Wankhede) यांनी नवाब मलिक यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा मुंबई हायकोर्टात दाखल केला होता.

नवाब मलिक यांच्याविरुद्ध दाखल केलेली ज्ञानदेव वानखेडे यांची याचिका हायकोर्टाने (Bombay High Court ) फेटाळून लावली आहे. तसंच, मलिक यांनाही पुरावे एकदा तपासून आरोप करावे, अशी सूचना दिली आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांनी आर्यन खानला केलेली अटक ही बनावट असल्याचं सांगत अनेक पुरावे सादर केले होते. एवढंच नाहीतर समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचा दावाच करत त्यांनी अनेक फोटो आणि कागदपत्र ट्वीट केले होते. त्यामुळे वानखेडे कुटुंबीयांनी बचावासाठी कोर्टात धाव घेतली होती.

समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांना मुंबई हायकोर्टात याची दाखल केली होती. पण, आज कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही. नवाब मलिक यांना समीर वानखेडे व त्यांच्या कुटुंबीयांविरोधात काहीही आक्षेपार्ह बोलण्यास मनाई करण्यास मुंबई हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला आहे. मात्र, नवाब मलिक यांना यापुढे वाजवी पद्धतीने माहितीची खातरजमा करूनच ट्विट करण्याचे हायकोर्टाने निर्देश दिले आहे.

ज्ञानदेव वानखेडे यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावल्यानंतर नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘सत्यमेव जयते’ म्हणत चुकीच्या बाबी विरोधातला आपला लढा सुरूच राहणार, असं मलिक यांनी आता ठणकावून सांगितलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here