Nawab Malik Arrested: नवाब मलिक इतके दिवस राहणार ईडी कोठडीत

0

मुंबई,दि.23: Nawab Malik Arrested: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. सकाळीच ईडीने त्यांना चौकशीसाठी त्यांच्या कार्यालयात आणले होते.

मुंबई अंडरवर्ल्डशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आज महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांना अटक केली. यापूर्वी ईडीच्या पथकाने राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांची बराच वेळ चौकशी केली होती. अटकेनंतर नवाब मलिक यांची जेजे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

त्यानंतर नवाब मलिक यांना पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. सुनावणीदरम्यान, ईडीने मलिक यांच्या कोठडीसाठी कोर्टाकडे 14 दिवसांची कोठडी मागितली. न्यायालयाने नवाब मलिक यांना 8 दिवसांच्या ईडी कोठडीत पाठवले आहे. नवाब मलिक आता 3 मार्चपर्यंत ईडीच्या कोठडीत राहणार आहेत.

नवाब मलिक यांच्या चौकशीवर महाराष्ट्र सरकारने आक्षेप घेत केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, दिलीप पाटील आणि राजेश टोपे यांनी शरद पवार यांच्या घरी भविष्यातील कृतीबाबत बैठक घेतली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here