सोलापूर,दि.21: सोलापुरात (Solapur News) घोड्यावर बसून तरुणांनी ‘नवरदेव मोर्चा’ (Solapur Navardev Morcha) काढला आहे. अनेकांनी विविध मोर्चे पाहिले असतील किंवा मोर्चाबद्दल ऐकले असेल. पण कधी नवरदेव मोर्चा (Navardev Morcha) पाहिला नसेल किंवा अशा मोर्चाबद्दल ऐकलेही नसेल. पण, आज सोलापूरमध्ये एक वेगळाच मोर्चा पाहण्यास मिळाला. लग्न होत नाही, मुली कुणी देत नाही म्हणून अविवाहित तरुणांनी चक्क जिल्ह्याधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला आहे.
हेही वाचा Halal Meat: हिजाबनंतर कर्नाटकात पुढचा मोठा वादाचा मुद्दा होऊ शकते हे
सोलापुरात नवरदेव मोर्चा | Navardev Morcha
आपल्या मागण्या घेऊन अनेक संघटना किंवा पक्ष मोर्चा काढतात. सध्या नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे. पण, सोलापूरमध्ये अविवाहित तरुणांनी वेगळ्याच मागणीसाठी मोर्चा काढला. अशात सोलापुरात नवरदेव मोर्चा काढण्यात आला आहे.
यांनी काढला हा अनोखा मोर्चा | Solapur Navardev Morcha
मोहोळ येथील राष्ट्रवादीचे नेते रमेश बारसकर यांच्या नेतृत्वात हा अनोखा मोर्चा निघाला होता. होम मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालयावर घोड्यावर बसून नवरदेव रवाना झाले होते.

बँड बाजा लावून मोर्चा | Solapur News
या मोर्चामध्ये चक्क नवरदेवाच्या वेशावत घोड्यावर बसून तरुण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. बँड बाजा लावून या तरुणाचा मोर्चा निघाला होता. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येनं नवरदेव कुठे चालले यामुळे लोकही बुचकळ्यात पडले होते. अखेर हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचला.
वय उलटून गेले तरी केवळ मुली मिळत नसल्याचं म्हणणं या तरुणांनी मांडलं. राज्य सरकारने गर्भलिंग निदान चाचणी बंद केली पाहिजे आणि त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे, आज 100 मागे 10 ते 12 मुलं लग्नाची राहिलेली आहेत. 5 वर्षानं वाढेल 15 ते 20 होतील. ही परिस्थिती चिंताजनक आहे. त्यामुळे राज्य सरकारने याचा विचार करावा, अशी मागणी या तरुणांनी केली आहे.