राष्ट्रीय आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकावर महिलेवर अत्त्याचार केल्याचा आरोप

0

हिंगोली,दि.४: राष्ट्रीय आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षकावर महिलेवर अत्त्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आरोपानंतर पोलिसांनी शिक्षकाला अटक करून न्यायालयात हजर केले. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षक मारोती कोटकर यास निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने यांनी नुकतेच निलंबनाचे आदेश काढले. एका महिलेला आमिष दाखवून आणि तिचे फोटो काढून धमकी देत तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप शिक्षकावर आहे.

शिक्षक मारोती कोटकरने सेनगाव तालुक्यातील वाघजाळी येथील एका महिलेला फ्लॅट देण्याचे आमिष दाखवले. यानंतर तिचे फोटो काढून तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने आरोपी शिक्षक मारोती कोटकरला निलंबित केले आहे.

‘मी तुमचा नातेवाईक आहे,’ असे सांगून वाघजाळी येथीला एका महिलेच्या कुटुंबीयांसोबत आरोपी शिक्षकाने जवळीक साधली. यानंतर त्या महिलेचे मोबाइलमध्ये आक्षेपार्ह फोटे काढले आणि धमकी देत तिच्यावर अत्याचार केला, असा शिक्षकावर आरोप आहे. या प्रकरणी १ एप्रिलला शिक्षकाविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणात पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलीस अधीक्षक येथील देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी शिक्षक मारोती कोटकरला अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवस कोटकरला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. तपासानंतर न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी शिक्षक मारोती कोटकरला हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा शिस्त व अपील नियम १९६४ चे नियम ३ प्रमाणे सेवेतून निलंबित केलं आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here