Nashik: अल्पवयीन मुलीला स्नॅपचॅटवरील मैत्री पडली महागात

Nashik Crime: एका 14 वर्षीय शाळकरी मुलीचे आक्षेपार्ह व्हिडीओ स्नॅपचॅट आणि...

0

नाशिक,दि.10: Nashik: अल्पवयीन मुलीला स्नॅपचॅटवरील मैत्री महागात पडली आहे. अलीकडच्या काळात शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी मोबाईलचा वापर करत असल्याचे दिसून येते. अनेक अल्पवयीन सोशल मीडियावर सक्रिय असतात. नाशिकच्या (Nashik Crime) देवळाली कॅम्प परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका 14 वर्षीय शाळकरी मुलीचे आक्षेपार्ह व्हिडीओ स्नॅपचॅट आणि इन्स्टाग्रामवर व्हायरल करुन तिचा विनयभंग करण्यात आला आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण? | Nashik Crime

देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीला स्नॅपचॅटवरील (Snapchat) मैत्रीच महागात पडली आहे. या ॲपवरील अनोळखी संशयिताने मुलीचे अश्लील फोटो घेत ते इन्स्टाग्रामवर व्हायरल केले आहेत. याबाबत अनोळखी संशयिताविरोधात देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पीडित मुलीच्या आईने देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार माझ्या मुलीने स्नॅपचॅटवर आलेली एका अनोळखी इसमाची रिक्वेस्ट शाळेतील मित्र असावा असे समजून स्वीकारली. त्यानंतर ते दोघेही चॅटिंग करु लागले होते. दरम्यान आरोपीने मुलीला धमकावून तिला स्वतःचे आक्षेपार्ह व्हिडीओ पाठवण्यास भाग पाडले आणि त्यानंतर ते व्हिडीओ स्नॅपचॅट तसेच इन्स्टाग्रामवर व्हायरल करत मुलीची बदनामी केली आहे.

पीडित आपल्या मैत्रिणींसोबत फोटो काढून…

देवळाली कॅम्प परिसरात राहणाऱ्या संबंधित अल्पवयीन मुलीने जानेवारी महिन्यात स्नॅपचॅट या ॲपवर अकाऊंट ओपन केले होते. त्यावर पीडित आपल्या मैत्रिणींसोबत फोटो काढून चॅटिंग करायची. त्यानंतर संशयिताने हे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हायरल केले. ही घटना पीडित मुलीच्या लक्षात येताच तिने आपल्या पालकांना घडलेली हकीकत सांगितली.

संशयित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल | Nashik

पालकांनी लागलीच देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात धाव घेत संशयित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञाताविरोधात विनयभंग, बाल लैंगिक अत्याचारापासून प्रतिबंध अधिनियम आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानूसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास केला जातो आहे. शहरात गेल्या एकच महिन्यात पॉक्सो आणि विनयभंगाचे 12 गुन्हे दाखल झाल्याने महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here