नाशिक,दि.13: पिकअप आणि ट्रकच्या भीषण अपघातात 6 जण ठार झाल्याची घटना घडली आहे. नाशिकमधील द्वारका उड्डाणपुलावर रविवारी सायंकाळी भीषण अपघात झाला आहे. 6 कामगारांचा भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. नाशिक- मुंबई- अग्रा महामार्गावर असलेल्या उड्डाण पुलावर हा भीषण अपघात झाला आहे. पाच जण गंभीर जखमी झाले आहेत, जखमींना स्थानिकांच्या मदतीनं जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे.
मुंबई-नाशिक महामार्गावर हा भीषण अपघात घडला. या अपघातामध्ये सहा तरुणांनी प्राण गमावला असून 5 लोक जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चार मृतदेह जिल्हा रुग्णालयात असून मृतदेहांची ओळख पटवून शव विच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. अन्य दोन जखमींचा उपचारादरम्यान खासगी रुग्णालयामध्ये मृत्यू झाला.
कामगारांच्या पिकअपने लोखंडी सळई घेऊन जाणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. नाशिकच्या द्वारका उड्डाणपुलाजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला आणि आसपासच्या लोकांची मदतीसाठी धावाधाव सुरु केली.