मुंबई, दि.३१: Naresh Mhaske: शिंदे गटाच्या नेत्याने अजित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी अजित पवार हे अनेकांना फोन करत होते, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. नरेश म्हस्के यांच्या दाव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी… | Naresh Mhaske On Ajit Pawar
खरं तर, ८ जानेवारी २०२३ रोजी एमसीए अर्थात महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनची निवडणूक पार पडली. या निवडणुकीत रोहित पवार अध्यक्ष पदासाठी निवडणुकीत उभे होते. या निवडणुकीत रोहित पवारांना पाडण्यासाठी स्वत: अजित पवार यांनी अनेकांना फोन केले, असा खळबळजनक आरोप नरेश म्हस्के यांनी केला आहे. अजित पवारांनी अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. संबंधित टीकेला उत्तर देताना नरेश म्हस्के यांनी हा गौप्यस्फोट केला. ते ठाणे येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा Amit Shah On Shivsena: महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप यांच्यातील जागावाटपाबाबत अमित शाह म्हणाले…
काय म्हणाले नरेश म्हस्के? | Naresh Mhaske
अजित पवारांवर आरोप करताना नरेश म्हस्के म्हणाले, “क्रिकेट कन्ट्रोल बोर्डाची निवडणूक होती. या निवडणुकीत रोहित पवार उमेदवार म्हणून उभे होते. आपण माहिती काढा, पवार कुटुंबातील कुठली व्यक्ती ‘रोहित पवारांना पाडा’ म्हणून सगळ्यांना निरोप देत होती. अजित पवार, तुम्ही आधी आपलं बघा. आपलं घरातलं बघा. नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याचा प्रयत्न करा. रोहित पवारांना पाडण्यासाठी आपण कुणाकुणाला फोन केले होते? कुणाला निरोप दिले होते? हे आधी सांगा. त्यानंतर आमच्यावर टीका करा.”