narendra modi: विरोध करणारे हे लोक इतर वेळेस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन मिरवत असतात: नरेंद्र मोदी

0

नवी दिल्ली,दि.15: narendra modi: विवेक अग्निहोत्री (Vivek Ranjan Agnihotri) यांच्या द काश्मीर फाइल्समध्ये (the kashmir files) काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराचे चित्रण आहे. ‘द काश्मीर फाईल्स’ (The Kashmir Files) हा चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. हा चित्रपट १९९० च्या दशकातील काश्मिरी पंडितांचे (Kashmiri Pandit) पलायन आणि त्यांची निर्दयी हत्या यावर आधारित आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेक प्रेक्षकांना त्यांचे अश्रू आवरता आलेले नाही.

देशभरामध्ये सध्या विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावरुन सोशल मीडियावरही वाद सुरु आहेत. विवेक अग्निहोत्रींच्या या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत असून बॉक्स ऑफिसवरही त्याने चांगली कमाई केलीय. सोशल नेटवर्किंगवर सध्या ‘द काश्मिर फाइल्स’वरुन चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहेत.

अनेकांनी या चित्रपटाबद्दल सकारात्मक मतं व्यक्त केली आहेत. तर काहींनी या चित्रपटाच्या माध्यमातून दोन समाजांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचे आरोप केलेत. दोन्ही बाजूने या चित्रपटाबद्दल बोललं जात असतं तरी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दणक्यात कमाई सुरु ठेवलीय हे सुद्धा विशेष आहे. या चित्रपटावरुन मतमतांतरे असतानाच आता थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन

दिल्लीमध्ये आज (15 मार्च 2022 रोजी) पार पडलेल्या भाजपाच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये पंतप्रधान मोदींनी सत्य गोष्टी समोर आल्या पाहिजेत हे सांगताना ‘द कश्मीर फाइल्स’ आणि त्याला होणाऱ्या विरोधाचं उदाहरण दिलं. मोदींनी या चित्रपटाला विरोध करणारे लोक इतर वेळेस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन मिरवत असतात असा टोलाही लगावला. “तुम्ही सध्या पाहिलं असेल की ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाची चर्चा सुरु आहे. जे लोक नेहमी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन फिरतात, ती पूर्ण जमात मागील पाच-सहा दिवसांपासून खवळलेली आहे,” असा टोला मोदींनी लगावला आहे.

सत्त्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न

“तथ्य आणि कला म्हणून या चित्रपटाचे विवेचन करण्याऐवजी त्याचं श्रेय हेरावून घेण्यासाठी एक मोहीम सुरु करण्यात आलीय. तुम्ही पाहिलं असेल, यासाठी एक पूर्ण इकोसिस्टीम काम करतेय. सत्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करण्यात आलाय,” असं पंतप्रधान या चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाले.

तसेच पुढे बोलताना पंतप्रधानांनी, “त्याला (निर्माता, दिग्दर्शकाला) जे सत्य वाटलं ते त्याने सादर करण्याचा प्रयत्न केला. पण त्या सत्याला न समजण्याची तयारी, ना स्वीकारण्याची त्यांची तयारी आहे. उलट जगाने हा (चित्रपट) पाहू नये असे त्यांचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या पद्धतीचे षडयंत्र मागील पाच-सहा दिवसांपासून सुरु आहे,” असं म्हटलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here