सोलापूर,दि.4: Narendra Modi On Lok Sabha Result: लोकसभा निवडणुकीसाठी देशातील 543 जागांवर ट्रेंड येऊ लागले आहेत. एक्झिट पोलच्या अंदाजांच्या तुलनेत इंडिया ब्लॉकमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले आहे. एनडीएला 290 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या ट्रेंडमध्ये भाजप बहुमताचा आकडा गाठताना दिसत नाही. भाजप 239 जागांवर आघाडीवर आहे, तर भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 290 जागांवर आघाडीवर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निकालाबाबत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
काय म्हणाले नरेंद्र मोदी | Narendra Modi On Lok Sabha Result
त्यांनी लिहिले की, लोकांनी सलग तिसऱ्यांदा एनडीएवर विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या इतिहासातील हा अभूतपूर्व क्षण आहे. जनतेच्या या आपुलकीला मी अभिवादन करतो आणि जनतेच्या आशा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी गेल्या दशकभरात केलेले चांगले काम आम्ही यापुढेही सुरू ठेवू, अशी ग्वाही देतो.