‘तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल’ नारायण राणे

0

मुंबई,दि.14: भाजपा नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटील यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे. उपोषणामुळे जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली आहे.

जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. मात्र त्यांची प्रकृती अत्यंत खालावली आहे. अन्न, पाणी, औषधही न घेतल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे. जरांगे पाटील यांच्या नाकातून रक्तस्राव होत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी उपचारास नकार दिला आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राज्यात फिरू न देण्याचा इशारा दिल्यानंतर नारायण राणे संतापले. नारायण राणे यांनी X वर पोस्ट करत जरांगे पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राणे यांनी जरांगे पाटील यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे म्हटले आहे.

काय म्हणाले नारायण राणे?

मनोज जरांगे पाटील याच्‍या डोक्‍यावर परिणाम झाल्‍यामळे तो आता काहीही बडबड करायला लागला आहे. त्‍याला मी मराठयांचा नेता मानत नाही. देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदी यांना महाराष्‍ट्रात फिरु देणार नाही अशी बेताल बडबड त्याने केली. त्‍याने आता मर्यादा ओलांडली आहे. माननीय पंतप्रधान जेंव्‍हा महाराष्‍ट्रात येतील त्‍यावेळी जागेवरुन हलून दाखव ! तुला असली मराठ्यांची ताकद दाखवून दिली जाईल. आपली औकात ओळखावी आणि अंथरुणावर पडून राहून नाटके करावीत !


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here