Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी ट्वीटमधून केला गौप्यस्फोट

0

दि.18: केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ट्विट करून गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर गंभीर आरोप केला. त्यानंतर भाजपा शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता या वादात नारायण राणेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मुंबई महापालिकेनं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्यांच्या बंगल्यातील बांधकामाची तपासणी आणि मोजमाप करण्यासाठी नोटीस पाठवली आहे. यावरुन राणे कुटुंबाकडून शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले जात आहे. स्वत: नारायण राणे यांनी ट्विट करत शिवसेनेच्या नेत्यांच्या घरी ईडीची धाड पडणार असल्याचा इशारा दिला आहे.

सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्याविषयी ट्विटमध्ये उल्लेख करण्यात आला आहे. यांच्या आत्महत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु होणार आहे. नारायण राणे यांनी ट्विटमध्ये सुशांतसिंह आणि दिशा सालियन यांच्या आत्महत्या नसून हत्या असल्याचा आरोप केला आहे. तसेच दिशा सालियनवर सामुहिक बलात्कार झाल्याचा आरोपही राणे यांनी आपल्या ट्वीटमध्ये केला आहे.



मातोश्रीमधील चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. हे ट्विट राणे यांनी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासाठी ‘महत्वाची बातमी’ असे म्हणत केलं आहे. तसेच ईडीची नोटीस आल्यावर विनायक राऊत आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार ? असा प्रश्नही राणे यांनी उपस्थित केला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here