Narayan Rane, Nilesh Rane: नारायण राणे व निलेश राणे यांची पोलिस ठाण्यात चौकशी सुरू

0

मुंबई,दि.५: दिशा सालियन प्रकरणी (disha salian case) केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि त्यांचे पुत्र, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईतील मालवणी पोलिस ठाण्यात हजर होत आपला जबाब नोदवला आहे. जबाब नोंदवण्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) आणि पुत्र, आमदार नितेश राणे (Nitesh Rane) मालवणी पोलिस ठाण्यात पोहोचले. त्यानंतर त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दोघांनाही बजावण्यात आलेल्या समन्सनुसार ते दिशा सालियन प्रकरणात आपला जबाब नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात हजर झाले.

दोघांनाही बजावण्यात आलेल्या समन्सनुसार ते दिशा सालियन प्रकरणात आपला जबाब नोंदवण्यासाठी पोलिस ठाण्यात हजर झाले. दिशाच्या वडिलांनी नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे यांच्या विरोधात मालवणी पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला होता. या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघांनाही समन्स धाडले होते.

दिशा सालियन प्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांना शुक्रवारी न्यायालयाने १० मार्चपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण दिले आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची माजी व्यवस्थापक दिशा सालियन हिच्याबद्दल बदनामीकारक आणि दिशाभूल करणारे वक्तव्य केल्याचा आरोप नारायण राणे आणि त्यांचा मुलगा नितेश राणे यांच्यावर करण्यात आला आहे.

अटकपूर्व जामिनासाठी याचिका

या प्रकरणात अटकेची शक्यता लक्षात घेत राणे पिता-पुत्राने त्यांचे वकील सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत मालाड येथील दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. हे प्रकरण सुनावणीस आले असता विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here