मुंबई,दि.:26: भाजपाचे नेते केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी माजी मुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदाय संजय राऊत यांना दिलेल्या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित केला आहे. महाराष्ट्रातील विश्वासघातकी सत्तांतरानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुफानी मुलाखत ‘सामना’ला दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली.
भाजप नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांचं एकेरी नाव घेत राणे यांनी गंभीर आरोप देखील केले आहेत. संजय राऊत यांच्यावरही राणे यांनी जोरदार हल्ला केला आहे.
मुख्यंत्र्यांनी अडीच वर्षात ना जनतेचं, शिवसेनेचं, हिंदुत्वाचं कोणतंही काम केलं नाही. आजारपण आणि मातोश्री यापलीकडे त्यांनी काही केलं नाही. आता ते आरोप करतायेत की मी आजारी असताना सरकार पाडलं. स्वतःच पद एकनाथ शिंदे यांच्याकडे गेल्याने त्यांना पोटशूळ उठला आहे.
मुख्यमंत्र्यांना पदावरुन खाली उतरवण्याचं काम संजय राऊत यांनी केलं आहे. संजय राऊत मनाने खुश असेल, की माझे नेते शरद पवार यांचे काम उत्तम केलं आहे. मातोश्रीबाहेर एकाही शिवसैनिकाल प्रेम दिलं नाही. असे दुष्टबुद्धीचे उद्धव ठाकरे आहेत.
नारायण राणे यांचे गंभीर आरोप
रमेश मोरे यांची हत्या कोणी केली? जयंत जाधव यांची हत्या कोणी केली? ठाण्याचा नगरसेवक याची हत्या कोणी केली? नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा सुपाऱ्या कोणाला दिल्या?
अडीच वर्षातून तीनदा मंत्रालयात आले. आजारी होते तर घरीच बसायचं होतं ना? ठाकरे जे सांगत आहे ते सर्व खोटं आहे. कोणाच्याही डोळ्यात अश्रू आले नाही.
यांनी कोणाला प्रेम दिलं नाही, कोणाला भेट दिली नाही, कोणाच्या दुःखात सहभागी झाले नाही, जे एकनाथ शिंदे यांनी दिलं म्हणून 50 आमदार त्यांच्यासोबत गेलेत.
संजय राऊत यांनी शिवसेनेचं वाटोळे केले. शिवसैनिकांच्या जीवावर खोके जमा केले. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रीपद संजय राऊत यांच्यामुळे गेले आहे. ही व्यक्ती पत्रकार नाहीतर जोकर आहे.