शिवसेनेबद्दल केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे मोठे वक्तव्य

0

सावंतवाडी,दि.९: शिवसेनेबद्दल केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांनी शिवसेनेतील वादावर भावनिक वक्तव्य केलं होतं. शिवसेना एकत्र असली पाहिजे, राहिली पाहिजे, गावगावातल्या शिवसैनिकांचे काय? शिवसेना संपावी असे कोणत्याही मराठी माणसाला वाटणार नाही. शिवसैनिकाच्या रक्तात सेना आहे, त्यामुळे तो सेनेपासून दूर जाऊ शकत नाही, असे छगन भुजबळ म्हणाले.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीही शिवसेना संपणार नाही असे वक्तव्य केले होते. संपायला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेच जबाबदार असून, मुख्यमंत्री असताना त्याना सरकार वाचवता आले नाही.यांच्या सारखे दुर्देव ते काय आता शिवसेना कदापी उभी राहणार नाही, अशी जोरदार टीका केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी केली. तसेच सतत सरकार पडणे हे महाराष्ट्राच्या हिताचे नसल्याचे सांगत शरद पवार यांच्या सारख्या ज्येष्ठ माणसाने पाडायची भाषा न करता अभिनंदन करावे, असे ही राणे म्हणाले.

केंद्रिय मंत्री राणे हे गोव्यावरून कणकवली कडे जात असताना सावंतवाडीत थांबले असता पत्रकारांशी संवाद साधला. राणे म्हणाले, मुख्यमंत्री असताना आमदार खासदार यांना न भेटणे मंत्र्यांना तासनतास ताटकळत उभे करून ठेवणे यामुळेच ठाकरे यांच्या बाबतचा रोष निर्माण झाला असून, त्यामुळेच हे आमदार फुटले आहेत. संजय राऊत यांनी शिवसेनेला मागे न्यायचे काम केले आहे.

ठाकरे यांना मातोश्री दिसायचे आणि राऊत यांना टार्गेट करणे हाच त्याचा एकमेव उद्देश होता. असे ही राणे म्हणाले पण मी सांगितल्या प्रमाणे हे सरकार कोसळले असल्याचे त्यांनी सांगितले. आता महाराष्ट्र विकासाकडे वाटचाल करीत असून नवनवीन प्रकल्प राज्यात येतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस हेच चांगले कम करतील असा आपणास विश्वास असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हे सरकार सहा महिन्यात कोसळेल असे म्हटले होते त्यावर भाष्य करतना राणे यांनी महाराष्ट्र सतत सरकार कोसळत राहिले तर विकास कसा होणार राज्याच्या हिताचे नाही.त्यामुळे पवार यांनी कधी तरी चांगले बोलावे असा टोला लगावला.

नारायण राणे यांनी आमदार दीपक केसरकर यांच्यावर बोलणे टाळत केसरकर यांच्या प्रश्नावर नो कॉमेंट्स असे उत्तर दिले तर विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या कौतुकावर बोलणे टाळत खरीच आमची आदरयुक्त भिती होती दहशतवाद करत बसलो नव्हता.किंवा मी मुख्यमंत्री आहे हे सांगावे लागत नव्हते असा टोला ही उध्दव ठाकरे यांना लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here