Narayan Rane: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

0

दि.27: narayan rane news: केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याने मालवणी पोलीस ठाण्यात नारायण राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांच्यावर सातत्याने दिशा सलियन यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप आहे. (narayan rane news)

महिला आयोगाला पोलिसांचा रिपोर्ट सादर झाल्यानंतर रात्री 12 वाजता मालवणी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या अहवालात दिशा सालियनच्या पोस्टमॉर्टममध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच ती गरोदर नव्हती असेही स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी महिला आयोगाला यासंदर्भात अहवाल दिला आहे. या संपूर्ण प्रकरणात लाखोंच्या संख्येने निर्माण करण्यात आलेल्या बोगस ट्विटर हॅण्डलची देखील चौकशी होणार असल्याची माहिती आहे.

महिला आयोगाकडे तक्रार

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar) यांनी दिशा सालियन प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांना पत्र लिहून भाजप नेते नारायण राणे असंवेदनशील राजकारण करून दिशा सालियन यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची बदनामी करत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. तसेच महापौर किशोरी पेडणेकर आणि राज्य महिला आयोगाच्या काही सदस्या दिशा सालियनच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी तिच्या घरी गेल्या होत्या. त्यावेळी सालियनच्या पालकांनी देखील राजकीय स्वार्थासाठी आमच्या मुलीची नाहक बदनामी केली जातेय असा आरोप करत महिला आयोगाकडे तक्रार केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here