Narayan Rane: केंद्रीयमंत्री नारायण राणेंना मोठा धक्का, राणेंच्या बंगल्यावर कारवाईचे आदेश

0

दि.20: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्या सिंधुदुर्ग (Sindhudurg district) जिल्ह्यातील मालवण चिवला (Malvan Chivla beach) बीचवरील नीलरत्न (Neelratna bungalow) या बंगल्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवसेना आणि भाजपमध्ये सध्या सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या युद्धातील प्रमुख शिलेदार नारायण राणे यांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. नारायण राणे (Narayan Rane) यांच्या कोकणातील निलरत्न या बंगल्यावर हातोडा पडण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे हा आदेश राज्य सरकार नव्हे तर केंद्रातून आला आहे.

मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर राणे कुटुंबीयांचा निलरत्न हा बंगला आहे. हा बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली होती. ऑगस्ट 2021 मध्ये ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. हा नारायण राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे आता नारायण राणे यावर काय भूमिका घेतात, हे पाहावे लागेल.

भारत सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयानं महाराष्ट्र पोस्टल जीवन प्राधिकरणाला हे आदेश दिल्याचं समजतंय.

काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगरपालिकेने नारायण राणे यांच्या जुहूतील अधिश बंगल्याला नोटीस बजावली होती. या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याचा संशय आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बंगल्याची पाहणी आणि मोजमाप केले जाण्याची शक्यता आहे. पालिकेच्या नोटीसनंतर नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपूत्र आक्रमक झाले होते. नारायण राणे यांनी आपल्या बंगल्यात एका इंचाचेही अनधिकृत बांधकाम नसल्याचा दावा केला होता. तर नितेश राणे यांनी पालिकेच्या नोटीसला योग्यवेळी प्रत्युत्तर दिले जाईल, असे म्हटले होते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here