महाविकास आघाडीसोबत सत्तेत राहण्याबाबत नाना पटोलेंचे मोठं वक्तव्य

0

दि.16: महाविकास आघाडीसोबत सत्तेत राहण्याबाबत महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) मोठं वक्तव्य केलं आहे. नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) आरोपांचा सपाटा सुरुच ठेवला आहे. आज देखील त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर भाजपला मदत केल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार केला आहे. सोबतच महाविकास आघाडीसोबत सत्तेत राहण्याबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी आज बोलताना म्हटलं की, गेल्या अडीच वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात भाजपला मदत करण्याचा राजकारण करत आहे. अडीच वर्षांपूर्वी ज्या मुद्द्यांवर सरकार बनलं होतं त्याचा उल्लंघन होत आहे.त्यामुळे आमच्या नेत्या सोनिया गांधी यांचा अपमान होत असून आम्ही ते सहन करणार नाही. पक्षश्रेष्ठींकडे राष्ट्रवादीच्या भूमिकेची आम्ही तक्रार केली आहे. पक्षश्रेष्ठी लवकरच त्या तक्रारीबद्दल निर्णय घेतील. येणाऱ्या काही दिवसात त्याचे परिणाम दिसतील. आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही, असं नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

काँग्रेस सरकारमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर आहे का? या प्रश्नावर बोलताना नाना पटोले यांनी म्हटलं की, येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला परिणाम दिसतीलच, आम्ही सत्तेत राहण्यासाठी सरकारमध्ये नाही.

काँग्रेसच्या शिबिराविषयी सांगताना ते म्हणाले की, काँग्रेसला देशाची चिंता आहे सध्या देशात राज्यघटना तसेच लोकशाही धोक्यात आली आहे. श्रीलंकेसारखी स्थिती होत आहे आणि त्यावरच काँग्रेसच्या चिंतन शिबिरामध्ये चर्चा झाली. येणाऱ्या निवडणुकांमध्ये 50 टक्के तरुणांना संधी देऊ, एक परिवार एक तिकीट याची अंमलबजावणी महाराष्ट्रात आगामी निवडणुकीपासून होणार आहे. 2 ॲाक्टोबरपासून काँग्रेस देशभरात पदयात्रा काढणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here