नाना पटोले यांचे राम मंदिराबाबत मोठं वक्तव्य म्हणाले सत्तेत आल्यानंतर…

0

मुंबई,दि.13: महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राम मंदिराबाबत मोठं वक्तव्य केले आहे. नाना पटोले हे राम मंदिराच्या शुद्धीकरणाबाबत बोलले आहेत. ते म्हणाले की, भाजपा सरकारने अयोध्येत राम मंदिर योग्य पद्धतीने आणि परंपरेने बांधले नाही. 

नाना पटोले पुढे म्हणाले की, निवडणुकीनंतर इंडिया आघाडी सत्तेवर आली तर अयोध्येतील राम मंदिराचे शुद्धीकरण करू. शंकराचार्य यांचा राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा करण्याला विरोध करत होते, मात्र भाजप सरकारने ऐकले नाही, त्यामुळे आता चारही शंकराचार्य राम मंदिराचे शुद्धीकरण करणार असल्याचे काँग्रेस नेते म्हणाले. 

रामदरबारही स्थापन केला जाईल

नाना पटोले पुढे म्हणाले की, चार शंकराचार्यही आपापल्या प्रथेनुसार रामदरबाराची स्थापना करतील. पटोले म्हणाले की, तेथे प्रभू रामाची मूर्ती नाही, तर राम ललाच्या बालरूपाची मूर्ती आहे. नरेंद्र मोदींनी राम मंदिराच्या उभारणीत प्रोटोकॉलच्या विरोधात काम केले असून ते धर्माच्या माध्यमातून दुरुस्त करू.

यासोबतच नाना पटोले यांनी अन्य मुद्द्यांवरही भाजपला कोंडीत पकडले. भाजपच्या मोदी सरकारनेही जीएसटीच्या नावाखाली सर्वसामान्यांची फसवणूक केली आहे, असे काँग्रेस नेते पटोले म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here