Nana Patole On Praful Patel: नाना पटोले यांचा प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप

0

मुंबई,दि.४: Nana Patole On Praful Patel: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादीतही दोन गट पडले आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. तसंच, महाआघाडीतील ठाकरे गट आणि काँग्रेसकडूनही टीकास्त्र सुरू आहे. दरम्यान नाना पटोले (Nana Patole) यांनी प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका केली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

नाना पटोले यांचा प्रफुल्ल पटेल यांच्यावर गंभीर आरोप | Nana Patole On Praful Patel

“प्रफुल्ल पटेल यांना नरेंद्र मोदी आणि अमित शाह स्पीच तयार करून देतात, असा मिश्किल टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. “मोदी-शाह सांगतील तसं प्रफुल्ल पटेलांना बोलावं लागतं. नाही बोललं तर फॉर्म्युला ठरलेला आहे. सत्तेत या नाहीतर जेलमध्ये जा”, असा आरोपही नाना पटोलेंनी (Nana Patole) केला आहे.

“हे लोक कशासाठी गेले आहेत, त्याचं आलेखन पवारांनी त्यांच्या प्रेसमध्ये केलं आहे. ईडी आणि सीबीआयच्या कारवाया कोणाकोणावर चालल्या आहेत हे त्यांनी वाचून दाखवलं. मोदी आणि शाह जेवढं सांगतात त्यापलिकडे काहीही करता येणार नाही”, असा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here