कोणी कोणाचा दोस्त नसतो, की दुश्मन नसतो, मोदी है तो मुमकिन है: नाना पटोले

0

मुंबई,दि.२४: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर कधीही निकाल लागू शकतो. राज्यातील वातावरण तापले आहे. अजित पवारांनी एका मुलाखतीमध्ये मला मुख्यमंत्री व्हायला १०० टक्के आवडेल असे वक्तव्य केले होते. यावरून राज्यात पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे. यातच काल खुद्द शरद पवारांनी महाविकास आघाडी आज आहे, उद्याचे सांगता येत नाही म्हणत याला आणखीनच खतपाणी घातल्याने उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत.

मोदी है तो मुमकिन है: नाना पटोले

यातच आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना अजित पवार मुख्यमंत्री होऊ शकतील का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला होता. यावर राजकारणात काहीही होऊ शकतं, कोणी कोणाचा दोस्त नसतो, की दुश्मन नसतो. मोदी है तो मुमकिन है, असे उत्तर दिले. 

याचबरोबर मी काही भविष्यवाला नाहीय. काँग्रेस पक्ष लोकशाहीला मानणारा आहे. येत्या निवडणुकीत काँग्रेसचे जास्त आमदार निवडून येतील आणि काँग्रेसचा मुख्यमंत्री होईल असे नाना पटोले म्हणाले. 

मुंबईतील वज्रमुठ सभेला आजुबाजुच्या जिल्ह्यांतून लोक यावेत यासाठी काँग्रेस नियोजन करत आहे. शरद पवार हे मोठे नेते आहेत. यापूर्वीच्या वज्रमुठ सभांना ते आलेले नाहीत. मोदी सरकार आल्यावर बेरोजगार, महागाई हे पाहून मोदी विरुद्ध आहे त्यांना सोबत घेऊन जाण गरजेचे आहे, अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचे नाना म्हणाले. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here