Nana Patekar On Ajit Pawar: अजित पवार हे इमानाने गुपचूप काम करत राहतात जाहिरात करत नाहीत: नाना पाटेकर

1

पुणे,दि.२२: Nana Patekar On Ajit Pawar: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘अजित पवार हे खरोखरच एक चांगले नेते आहेत. अजित पवार खूप काम करतात, पण जाहिरात करत नाहीत,’ असं नाना पाटेकर म्हणाले.

पुण्यातील विधानभवनात अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा कोरोना आढावा बैठक सुरू आहे. या बैठकीपूर्वी नानांनी अजित पवारांची भेट घेतली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ‘राजकारणी लोकांनी केलेल्या कामाला प्रसिद्धी मिळत नाही. आम्हाला जास्त प्रसिद्धी मिळते. अजित पवार हे इमानाने गुपचूप काम करत राहतात. जाहिरात करत नाहीत. एखादी कुठली गोष्टी चुकली की मीडिया लगेच ते अधोरेखित करतो. पण अजित पवारांनी केलेलं काम लोकांसमोर आणा, असं आवाहन नाना पाटेकर यांनी माध्यमांना केलं.

‘पक्ष बदलणाऱ्या माणसाला पाच वर्षे कोणतेही पद दिले जाता कामा नये. तसं झाल्यास कोणीही पक्ष बदलणार नाही. काहीतरी नियम असायला हवे. किमान शिक्षणाची अट हवी,’ असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

अमोल कोल्हेंची पाठराखण

राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या नथुराम गोडसे यांच्या भूमिकेची नाना पाटेकर यांनी पाठराखण केली. ‘अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत, त्यांनी कोणती भूमिका करायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. तीस वर्षांपूर्वी मीही गोडसेंची भूमिका केली होती. याचा अर्थ मी त्याचं समर्थन करतो का? समर्थन केलं असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकता. ते माझं उपजीविकेचे साधन, यात माझी काय चूक आहे का? प्रत्येक गोष्टीचं भांडवल करायची गरज नाही. शिवाजी महाराजांची भूमिका केली, त्यावेळी तुम्ही त्यांना का विचारले नाही, ही भूमिका का केली? त्यावेळी कलाकार म्हणून कोल्हे यांना मान्य केलं ना,’ असा सवाल नानांनी टीकाकारांना केला.


1 COMMENT

  1. नाना साहेब, राज्यात सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी गेल्या 50वर्षापासून तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. अर्धपोटी राहुन वाचक लेखक, सरस्वतीची सेवा करीत आहेत. आपणास विनंती कि, अजित पवार साहेब अर्थमंत्री आहेत, सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी यांना व्यवस्थित जगण्यासाठी किमान वेतन द्यावे अशी आमची मागणी त्यांच्या पर्यंत पोहचवा. आपणास विनंती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here