औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण; उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

0

मुंबई,दि.८: औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण प्रकरणी उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. राज्य सरकारने काही दिवसापूर्वी औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशिव केले होते. या जिल्ह्यांचे नामकरण केल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. यावर आज न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायालयाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे नामकरण करण्यासाठी घेतलेला निर्णय कोणत्याही नियमांचे उल्लंघन करणारा नाही, असं म्हटले आहे.  

राज्य सरकारचा नामकरणाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरविला आहे. सरकारने घेतलेला हा निर्णय बेकायदेशीर नाही असं न्यायालयाने म्हटले आहे. अनेक याचिकांद्वारे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला आव्हान दिले होते. न्यायाधीश देवेंद्र उपाध्याय आणि न्यायाधीश आरीफ एस. डॉक्टर यांच्या खंडपीठाने या सर्व याचिका आज फेटाळल्या आहेत.

संभाजीनगर आणि धाराशिव, असे नामांतर करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला होता. पण यानंतर शिंदे-फडणवीस सरकारने पण त्या सरकारला निर्णय घेण्याचे अधिकार नव्हते, असे कारण देत आज नव्याने निर्णय घेताना ‘संभाजीनगर’ऐवजी ‘छत्रपती संभाजीनगर’ असा नामविस्तार करण्यात आला. जुलै २०२२ मध्ये शिंदे-फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयाला फेब्रुवारी २०२३ मध्ये केंद्र सरकारने मंजुरी दिली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here