Nagin Dance: नागिन डान्स (Nagin Dance) अनेकांनी केला असेल, पाहिला असेल. नागिन डान्स प्रकार अत्यंत लोकप्रिय आहे. सोशल मीडियावर नागिन डान्सचे (Nagin Dance) अनेक व्हिडिओ व्हायरल (Video Viral) होतात. अनेकांच्या लग्नात नागिन डान्स पाहिला असेल. असाच एक नागिन डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. नवरदेवाच्या वरातीतील हा डान्स व्हिडिओ आहे. नवरदेवाचा मित्र नागिन डान्स करताना दिसून येत आहे.
सोशल मीडियावर नवरदेवाच्या मित्राचा व्हिडीओ (marriage viral video) सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतो. या व्हिडिओतील मित्र नवरदेवाच्या घोडीवर चढून नागिन डान्स (Nagin dance) करतोय. इतकंच नव्हे तर तो घोडीवर बसल्या बसल्या सर्कसमधील कसरतींसारखा डान्स करतोय, जे पाहून तुम्हीही क्षणभर थक्क व्हाल.
लग्नाच्या वरातीत अनेक लोक नागिन डान्स करताना दिसतात. बरेच लोक नाचण्यात इतके मग्न होतात की ते डीजेच्या तालावर बेभान होऊन नाचतात. पण सध्या सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मित्र घोडीवर बसून नागिन डान्स करत आहे. नवरदेवही याच घोडीवर बसलेला आहे. अशा परिस्थितीतही तो मित्र घोडीवर बसून कलाबाजी दाखवत भाव खाऊन जाताना दिसतोय.
नवरदेवाची वरात सुरू असताना नाचणारा एक मित्र अचानक उडी मारून वराच्या घोडीवर बसतो आणि नागिन डान्स सुरू करतो. आश्चर्य म्हणजे त्या वेळी नवरदेवही घोडीवर मागे बसलेला असतो. नवरदेवाच्या तोंडात दाबलेले पैसेदेखील हा कलाकार हळूवारपणे काढून घेताना दिसतो आणि आनंदाने नाचतानाही दिसतो.
हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. अनेक युजर्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिलंय की, ‘मित्राच्या नागिन डान्सने आग लावली…!’ दुसऱ्या एका व्यक्तीने लिहिलंय की, ‘या नागिन डान्सने फिजिक्सचे सगळे नियम चुकीचे असल्याचं सिद्ध केलं.’ दरम्यान हा मजेदार व्हिडिओ Godman Chikna हा नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हि़डीओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.