धाराशिव,दि.२४: हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके (Nagesh Madake) यांचे अपहरण करून मारहाण (Hotel Bhagyashree Owner Kidnapped) करण्यात आल्याची घटना घडली आहे. सोशल मिडीयावर हॉटेल भाग्यश्रीचे मालक अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत.
नागेश मडके यांचे अपहरण केल्यानंतर मारहाण केली आणि पुलावर फेकून देत अपहरण करणारे निघून गेल्याची माहिती हॉटेल मालकाने दिली. बुधवारी सायंकाळी ही घटना घडली असून सध्या हॉटेल मालकावर जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके हे बुधवारी सायंकाळी सातच्या सुमारास त्यांच्या हॉटेलसमोर उभे होते. तेव्हा तिथं आलेल्या एका चारचाकी गाडीतून काही लोक आले. त्यांनी नागेश मडके यांच्यासोबत फोटो काढायचा असल्याचं सांगितलं. सेल्फीच्या बहाण्याने नागेश मडके यांना गाडीत जबरदस्तीने बसवून ओढत नेण्यात आलं.
गाडीतच नागेश मडके यांना मारहाण केली. ४ ते ५ जणांनी मारहाण केल्याचा आरोप मडके यांनी केला. अपहरण करुन गाडी धाराशिवच्या दिशेने घेऊन गेले. त्यांचा मला जीवे मारण्याचा कट होता असा आरोपही त्यांनी केला.