दि.21 : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. काहीवेळा सोशल मीडियावरील अफवांमुळे दोन धर्मात तेढ निर्माण होते. अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करणाऱ्यांचा हेतू मुळातच समाजात अशांतता पसरवण्याचा असतो. अनेकदा व्हायरल झालेले फोटो, व्हिडीओ खोटे असल्याचं समजतं. मात्र ही माहिती समोर येईपर्यंत व्हायचं ते नुकसान होऊन गेलेलं असतं. कधीकधी दोन धर्मांना जोडणारे व्हिडीओदेखील समोर येतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
एक मुस्लिम व्यक्ती सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओत महाभारत मालिकेचं शीर्षकगीत गात असल्याचे दिसत आहे. गाणाऱ्या व्यक्तीचा आवाज अगदी मंत्रमुग्ध करून टाकणारा आहे. स्पष्ट उच्चार, अचूक लय यामुळे अनेकांनी गाणाऱ्या व्यक्तीचं कौतुक केलं आहे. डॉक्टर नागर यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.
कुछ विडियो बहुत आह्लादित कर जाते है।👇 pic.twitter.com/ayhLIQX7c3
— Doctor Nagar (@NagarJitendra) September 19, 2021
महाभारताच्या शीर्षक गीतामध्ये शंख फुंकण्याचा आवाज आहे. तोदेखील मुस्लिम व्यक्तीनं अतिशय सुंदररित्या काढला आहे. या व्हिडीओचं अनेकांनी कौतुक केलं आहे. मुस्लिम चाचांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. दुसऱ्या धर्माचा आदर केल्यानं आपला धर्म लहान होत नाही, हीच तर गंगा जमुना संस्कृती आहे, अशा स्वरुपाच्या प्रतिक्रिया व्हिडीओवर येत आहेत.