रिक्षाचालक कशी करतात फसवणूक, पोलिसांनी शेअर केला व्हिडीओ 

0

मुंबई,दि.24: रिक्षाचालक कशी फसवणूक करतात याबाबत मुंबई पोलिसांनी व्हिडीओ शेअर केला आहे. अनेकदा अनेकांना रिक्षाचालक फसवणूक करतात असा संशय असतो मात्र ते कसे सिध्द करायचे असा प्रश्न उपस्थित होतो. रिक्षाचालकाने फसवणूक केल्यास कसे पकडता येईल याबाबत पोलिसांनी व्हिडीओ शेअर केला आहे. 

अनेकदा रिक्षाचालकांबरोबर खटके उडण्याचं कारण ठरतं तो तो म्हणजे मीटर! अनेक रिक्षांमधील मीटर हे कापलेल्या अंतरापेक्षा अधिक रक्कम दाखवतात आणि त्यामुळे प्रवाशांचा रिक्षाचालकांबरोबर वाद होतो. बऱ्याचदा रिक्षाचा मीटर हा गरजेपेक्षा अधिक वेगाने पळत असल्याचं जाणवतं पण आपली फसवणूक होत आहे हे ग्राहकांना सिद्ध करता येत नाही. मात्र आता मुंबई वाहतूक पोलिसांनीच एक व्हिडीओ शेअर करत असे सदोष मीटर कसे ओळखावेत याची माहिती दिली आहे. 

सदर व्हिडीओ एका रिक्षात शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओमधील मीटर हा ‘घोडा मीटर’ असल्याचं सांगितलं जात आहे. म्हणजेच घोडा ज्या वेगाने पळतो त्याच वेगाने रिक्षातील मीटर पळत असल्याने त्याला ‘घोडा मीटर’ असं नाव देण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये एका जागी उभ्या असलेल्या रिक्षाचा मीटर कशाप्रकारे वेगाने धावतो हे दाखवण्यात आलं आहे. मात्र हा मीटर वेगाने पळवण्यासाठीचं बटण हे रिक्षाचालकाजवळ पुढे रिक्षाच्या हॅण्डलमागे असते असं व्हिडीओत दिसत आहे. हे बटण सुरु केल्यानंतर मीटर वेगाने पळतो. तर बंद केल्यास सामान्य वेगात मीटर चालतो. मात्र हे बटण सुरु केल्याचं ग्राहकांनाही सहज समजू शकतं. मीटर हा वेगाने पळवला जात असल्याचं कसं ओळखावं याची एक छोटी निशाणी मीटरवरच दिसते. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here