मुंबई,दि.२७: Mumbai Police On Manoj Jarange: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबईच्या दिशेने निघाले आहेत. अनेक मराठा आंदोलक राज्यभरातून मुंबईकडे रवाना झाले आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी 29 अॅागस्टपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरु करणार असल्याचे जाहीर केले होते. ते मुंबईत येऊन आझाद मैदानात बेमुदत उपोषणाला बसणार आहेत.
महाराष्ट्रासह मुंबईत एकीकडे गणेशोत्सवाची धूम चालू आहे. अशातच मनोज जरांगे यांच्या आंदोलनामुळे राज्य सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. जरांगे पाटील यांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी मिळाली आहे. पण ही परवानगी देताना एकूण आठ आटी घालण्यात आल्या आहेत. जरांगे यांनी मुंबईत येऊन बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशातच मनोज जरांगे पाटील हे सकाळी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने आंदोलकांसह रवाना झाले आहेत. अशातच आता मनोज जरागेंच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई पोलिसांनी एका दिवसाची परवानगी दिली आहे. मुंबईत आंदोलन करण्यासाठी एक दिवसाची परवानगी त्यांना देण्यात आली आहे. यामध्ये शनिवारी, रविवारी आंदोलनाला परवानगी नसणार आहे.
मुंबई पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी देण्यात आली असून यामध्ये 5 हजार आंदोलकांना सहभागी होता येणार आहे. तसेच या आंदोलनाला अटी-शर्तींसह परवानगी देण्यात आली आहे.
आंदोलनासाठी अटी | Mumbai Police On Manoj Jarange
– सुट्टीच्या दिवशी कोणत्याही परवानग्या नाहीत
– आंदोलकासोबत 5 वाहनांना परवानगी
– 5 हजार आंदोलकांना परवानगी
– 7 हजार चौरस मीटर आंदोलनासाठी राखीव जागा
– मोर्चा दुसरीकडे नेता येणार नाही
– ध्वनीक्षेपक, गोंगाट करणारी उपकरणं वापरण्याला मनाई
– आंदोलनासाठी सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंतची वेळ
काय म्हणाले मनोज जरांगे पाटील?
पोलिसांनी दिलेल्या परवानगीवर मनोज जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी ते बोलताना म्हणाले की, मुंबई पोलिसांकडून आंदोलनाची परवानगी देण्यात आली आहे. आम्ही नियमांचं पालन करून आंदोलन करणार. परवानगी दिली असेल तर स्वागत मात्र एक दिवसांचं परवानगी मान्य नसल्याचं मनोज जरांगे यावेली म्हणाले. तसेच एका दिवसात आरक्षण द्या आंदोलन मागे घेतो असं देखील मनोज जरांगे म्हणाले.