मुंबई,दि.१: Mumbai HighCourt On Maratha Andolan: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावे अशी मागणी करत उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज ४था दिवस आहे. जरांगे यांच्या या आंदोलनालामुळे संपूर्ण मुंबईचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. याच कारणामुळे जरांगेंच्या आंदोलनाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
याचिकेवर सुनावणी करताना मुंबई हायकोर्ट म्हणाले, आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही पण नियमांचे पालन व्हायला पाहिजे. पण युक्तिवाद सुरु असतानाच न्यायाधीशांनी संताप व्यक्त केलाय. मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना राज्याचे महाधिवक्ते विरेंद्र सराफ यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनादरम्यान सर्व नियमांचे उल्लंघन करण्यात आले. 5000 आंदोलकांची मर्यादाही ओलांडण्यात आली.
5 हजार पेक्षा जात आंदोलनांना परवानगी नसताना जर रस्त्यावर आंदोलक एकत्र येत असेल तर मग तुम्ही रस्ते रिकामे का करत नाही अशी विचारणा कोर्टाने राज्य सरकारला केली आहे. मुंबई बाहेरून येणाऱ्या आंदोलकांना बाहेरच थांबावं असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. नियमाचे आणि अटीचे उल्लंघन होत असल्याचे मनोज जरांगे आणि विरेंद्र पवार यांना नोटीस पाठवून सांगू शकता का? असा प्रश्न न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे.
आंदोलन थांबण्याचे आदेश न्यायालयाने द्यावेत अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायालयाने कारवाई करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. सरकार आंदोलकांना काढू शकत नाही. महिला पोलिस अधिकारी अक्षरशः पाय पडत आहेत, त्यामुळे कारवाईचे आदेश द्यावेत अशी मागणी त्यांनी केली. नियम आणि अटीचे पालन करण्यासाठी कठोर व्हावे लागले तरी चालेल असे न्यायालयाने म्हटले आहे.
आम्ही जे नियम अटी यांच्या आधारे परवानगी देण्याचे आदेश दिले होते त्याच पालन सरकारने करावे असं हायकोर्टाने सांगितलं आहे. आम्ही आंदोलनाच्या विरोधात नाही पण नियमांचे पालन व्हायला हवं असं मत त्यांनी मांडलं होतं. उद्या शाळा महाविद्यालयांवर परिणाम व्हायला नको, लोकांच्या नोकऱ्यांवर परिणाम व्हायला नको. लोकांना मूलभूत गरजा मिळायला आणि मुंबईतल साहित्य बाहेर जायला अडचण व्हायला नको असंही कोर्टाने सांगितलं आहे. मराठा आंदोलनाबाबत हायकोर्ट उद्या घेणार निर्णय आहे. मंगळवारी 3 वाजता होणार सुनावणी