Mumbai Corona: या पालिकेने वाढवली रुग्णालयातील बेडची संख्या; वाढत आहे कोरोना रुग्णांची संख्या

0

मुंबई,दि.27: Mumbai Corona: महाराष्ट्रात कोरोना (Maharashtra Corona) रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. सध्या देशभरात कोरोना संसर्ग वाढत आहे. सोलापूर शहरात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 44 झाली आहे. तर ग्रामीण भागातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 15 आहे. सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Covid Positive Patients) आढळणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही (Maharashtra) नंबर आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या दोन रुग्णालयातील खाटांची संख्या वाढवण्यात आली आहे. मुंबई पालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं आहे. वाढत्या कोरोनामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. (Mumbai Corona News)

मुंबईतही वाढत आहे रुग्णांची संख्या | Mumbai Corona

मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये 1,850 आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 30 बेड आहेत. बीएमसीने म्हटलं आहे की, जेव्हा-जेव्हा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होईल तेव्हा आवश्यकतेनुसार रुग्णालयातील बेडची संख्या आणखी वाढविली जाईल. तसेच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी तसेच उपकरणे देखील वाढविली जातील.

दरम्यान, अलिकडे कोरोना विषाणू आणि व्हायरल H3N2 इन्फ्लूएंझा या दुहेरी संसर्गाला लोक बळी पडत आहेत. पण नागरिकांना याकडे दुर्लक्ष न करता आरोग्याची योग्य प्रकारे काळजी घ्या. मास्क वापर, सोशल डिस्टंसिंग पाळा, शक्य असल्यास गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा, असा सल्ला आरोग्य मंत्रालयाने दिला आहे.

मुंबईत 123 नवीन कोरोना पॉझिटिव्ह | Mumbai Corona News

मुंबईतही कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मुंबईत सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 500 च्या पुढे गेली. मागील 24 तासांत मुंबई 123 नवीन प्रकरणांची नोंद झाली आहे. मुंबईत 43 रुग्ण रुग्णालयात दाखल असून 21 रुग्ण व्हेंटिलटरवर आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या देखील वाढताना दिसत आहे. राज्यात रविवारी एकूण 1956 सक्रिय रुग्णांची नोंद झाली. राज्यात शनिवारी 437 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली तर, दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here