दि.7: उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे रविवारी भाजप नेते आणि शेतकरी (Farmers) यांच्यात झालेल्या हिंसाचारामुळे अजूनही तणावाचं वातावरण आहे. या घटनेशी संबंधित अनेक व्हिडिओ आतापर्यंत समोर आले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश आणि केंद्र सरकारवर विरोधक आक्रमक झाले आहेत. आता या घटनेसंदर्भातला धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
या घटनेशी संबंधित आणखी एक व्हिडिओ बुधवारी रात्री समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे खासदार वरूण गांधी यांनी ही लखीमपुर खेरीमध्ये झालेल्या हत्तेच्या संदर्भातील व्हिडिओ आपल्या ट्विटर हँडवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ अधिक धक्कादायक आहे.
The video is crystal clear. Protestors cannot be silenced through murder. There has to be accountability for the innocent blood of farmers that has been spilled and justice must be delivered before a message of arrogance and cruelty enters the minds of every farmer. 🙏🏻🙏🏻 pic.twitter.com/Z6NLCfuujK
— Varun Gandhi (@varungandhi80) October 7, 2021
या व्हिडीओत काळ्या रंगाची एसयुव्ही वेगानं येताना दिसतेय. त्यानंतर ती कार शेतकऱ्यांना चिरडून पुढे जात असल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
या दरम्यान, मागून भरधाव वेगाने जाणारी कार पटकन शेतकर्यांवर चढते आणि पुढे जाते. त्याच्या मागे आणखी दोन गाड्या जाताना दिसतात. घटनेनंतर लगेचच लोक इकडे -तिकडे धावताना दिसत आहेत.