mp news: भाजपा आमदारांच्या मुलांनी वन कर्मचाऱ्यांना केली मारहाण, गुन्हा दाखल

0

श्योपुर,दि.२४:mp news: मद्यधुंद आमदारांच्या मुलांनी वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये उघडकीस आली असून, पोलिसांनी मोठ्या वेळानंतर गुन्हा दाखल केला आहे. श्योपूरमध्ये सत्तेच्या नशेत मद्यधुंद भाजप आमदाराच्या मुलांनी चांगलाच गोंधळ घातला. श्योपूरमधील विजयपूर येथील भाजप आमदार सीताराम आदिवासी यांचा मुलगा धनराज आणि दीनदयाळ आदिवासी यांनी त्यांच्या काही साथीदारांसह बुढेरा वन परिक्षेत्रातील पिपराणी वन चौकीवर तैनात असलेल्या वनकर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत त्यांना बेदम मारहाण केली.

सत्ताधारी भाजप आमदार सीताराम आदिवासी यांच्या मुलांनी वनकर्मचाऱ्यांना उघडपणे गुंडगिरी करत मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलीस उपविभागीय अधिकारी राम तिलक मालवीय यांनी सांगितले की, आयपीसीसीच्या कलम ३२३, कलम २९४ आणि कलम ५०६ अंतर्गत धनराज, दीनदयाल, टिल्लू आणि अन्य एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धनराज आणि दीनदयाल हे भाजप आमदाराचे पुत्र आहेत.

श्योपुरमधील विजयपूरच्या भाजप आमदाराच्या मुलांनी वनकर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप आहे कारण वनकर्मचाऱ्यांनी आमदार पुत्राला अवैध उत्खनन आणि जंगलातून वाळू आणि दगडांची अवैध वाहतूक करण्यास प्रतिबंध केला होता.

हाच प्रकार प्रभावशाली आमदार वडिलांच्या मुलांना आवडला नाही आणि सत्तेच्या नशेत असलेल्या आमदार पुत्रांनी पिपराणी गावातील वन चौकी गाठून दोन वनकर्मचारी व एका वाहनचालकाला अश्लील शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचबरोबर जीवे मारण्याची धमकी देत वनकर्मचाऱ्यांचे कपडेही फाडले.

भाजप आमदाराच्या मुलांनी वनकर्मचाऱ्यांवर हल्ला केल्याची घटना घडल्यानंतर पीडित वनकर्मचारी आमदार पुत्रांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यासाठी करहाळ पोलीस ठाण्यात पोहोचले, तेव्हा श्योपूर पोलीसही आमदारांच्या प्रभावाखाली असलेले दिसून आले.

भाजपच्या आमदारामुळे करहाळ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी जखमी वनकर्मचाऱ्यांना मेडिकलही (MLC) करून घेतले नाही, त्यानंतर एफआयआर नोंदवण्याऐवजी केवळ अर्ज करून चौकशीची चर्चा करून त्यांना पळवून लावले, असा आरोप पीडित वनकर्मचाऱ्यांनी केला आहे. मात्र, नंतर गुन्हा दाखल करावा लागला.

श्योपूर पोलिसांना मारहाण करणाऱ्या आमदाराच्या आरोपी मुलांची नावे सांगितल्यानंतरही पोलिस चौकशी करू, असे सांगून आरोपींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. या संपूर्ण प्रकरणात सामान्य वनविभागाचे अधिकारीही मौन बाळगून आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here