MP Congress: काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पहिल्यांदाच भगव्या रंगाचे झेंडे

0

भोपाळ,दि.२: MP Congress: काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पहिल्यांदाच भगव्या रंगाचे झेंडे पाहायला मिळाले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या (BJP) कार्यालयात किंवा अनेक कार्यक्रमात भगव्या रंगाचे झेंडे पाहायला मिळतात. पण प्रथमच काँग्रेस कार्यालयात भगव्या रंगाचे झेंडे पाहायला मिळाले. मध्य प्रदेशात यावर्षी होणाऱ्या निवडणुकांबाबत काँग्रेसनेही (MP Congress) आपली रणनीती बदलली आहे. राज्याची राजधानी भोपाळमध्ये एक अजब नजारा पाहायला मिळाला. भोपाळ येथील प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पहिल्यांदाच भगव्या रंगाचे झेंडे लावण्यात आले आहेत. काँग्रेस कार्यालयाचा बाहेरील भागात आणि आतील सजावटीत सर्वत्र भगवा रंग दिसून येत आहे. रविवारी प्रदेश काँग्रेस कार्यालयात काँग्रेस पुजारी सेलचा एकदिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पक्षाने धर्मसंवाद आणि मठ मंदिर स्वायत्त संकल्प दिन म्हणून त्याचे आयोजन केले आहे. काँग्रेसच्या कार्यालयात भगवे झेंडे फडकवल्याचे दृश्य राज्यात पहिल्यांदा पाहायला मिळाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा Karnataka Opinion Poll: ओपिनियन पोल्सची धक्कादायक आकडेवारी समोर 

काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पहिल्यांदाच भगव्या रंगाचे झेंडे

धर्म सवांद या कार्यक्रमामुळे काँग्रेस कार्यालयाला सजवण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे यावेळी कार्यालयात भगवा रंग सगळ्यांमध्ये उठून दिसत आहे. मध्य प्रदेश काँग्रेस मंदिर पुजारी सेलचे प्रतिनिधी सुधीर भारती यांनी सांगितले की, मंदिर पुजारी सेलचे लोकप्रतिनिधी, जिल्हाध्यक्ष, महंत आणि राज्यभरातील मठ आणि मंदिरांचे पुजारी यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते, धर्मसंवाद कार्यक्रमात सहभागी होत आहेत. निवडणुकीपूर्वी काँग्रेसने आपल्या हिंदुत्वाच्या योजनेवर काम सुरू केले आहे.

…अशा आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसने | MP Congress

पुढील ६ ते ७ महिन्यांनी मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशा परिस्थितीत सर्वच राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस हिंदू धर्माचा आदर करत नाही आणि इतर धर्माच्या नागरिकांचे लांगुनचालन करते असा आरोप भाजपाने अनेकदा केला आहे. अशा आरोपांना उत्तर देण्यासाठी काँग्रेसने या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ हे सध्या प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. हनुमानाचे भक्त म्हणून छिंदवाड्यात त्यांची ख्याती आहे. कमलनाथ यांनी छिंदवाडाजवळील त्यांच्या मतदारसंघातील शिकारपूर गावात भव्य हनुमानाची मूर्ती बसवली आहे, पण काँग्रेसला त्याचा फारसा प्रचार करता आला नाही.

यावेळी भाजपाचे लक्ष छिंदवाडा आहे. यासाठी भाजपाने हिंदुत्वाच्या राजकारणातील प्रमुख चेहरा केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना छिंदवाडामध्ये प्रोजेक्ट केले आहे. ते सातत्याने दौरे करत आहेत. अशा स्थितीत या निवडणुकीत भाजपा हिंदुत्वाच्या अजेंड्यावर लढणार असल्याचे कमलनाथ यांना स्पष्टपणे समजले आहे. हे लक्षात घेऊन काँग्रेसने आतापासूनच भगवा अजेंडा राबवला आहे. काँग्रेसला असा कोणताही मुद्दा भाजपाच्या हाती सोपवायचा नाही म्हणजे त्यातून आपली प्रतिमा हिंदुत्वविरोधी आहे.

कमलनाथ हे भाजपासाठी आव्हान का बनले?

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने राज्यातील एकूण २९ लोकसभा जागांपैकी २८ जागा जिंकल्या होत्या. संपूर्ण देशात मोदी लाट होती, पण छिंदवाडा हा काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला राहिला. २०२३ च्या विधानसभा आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला हा गड जिंकायचा आहे. सध्या कमलनाथ छिंदवाडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. त्याचवेळी त्यांचा मुलगा नकुलनाथ छिंदवाडा लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here