मोबाईल रिचार्जवर PhonePe कडून आकारले जातायेत अधिकचे पैसे

0

दि.23: ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी ऑनलाईन पेंमेंट केले जाते. PhonePe चा अनेकजण करतात. रेस्टॉरंट, किराणा दुकान व इतर ठिकाणी अनेकजण PhonePe द्वारे पेमेंट करतात. अनेकजण मोबाईल रिचार्ज फोनपे द्वारे करतात. पण आता डिजिटल पेमेंट कंपनी फोन पे (Digital Payment Company PhonePe) वापरणे महाग झालं आहे.

काही यूजर्सकडून फोन पे ने मोबाईल रिचार्जवर 1 ते 2 रुपये फ्लॅटफॉर्म फी चार्ज (Platform Fee) करणे सुरु केले आहे. कोणत्याही पेमेंट मोडद्वार (UPI, Credit card, Debit Card, Phone Pay Wallet) रिचार्ज केला तरी हा अधिकचा चार्ज केला जात आहे.

कंपनीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, जे लोक या प्रयोगाचा भाग आहेत त्यांच्यासाठी 50 ते 100 रुपयांच्या व्यवहारासाठी 1 रुपये आणि 100 रुपयांपेक्षा जास्त व्यवहारासाठी 2 रुपये शुल्क आकारजे जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, प्रवक्त्यांनी सांगितले की, हा एक स्मॉल बेसवर प्रयोग आहे. बहुतेक यूजर्सकडून कदाचित 1 रुपये आकारले जात आहेत आणि ते ॲक्टिव्ह यूजर्स आहेत. मात्र याबाबत अद्याप काहीही ठरलेले नाही.

अलीकडेच, फोनपेने माहिती दिली की त्याला जीवन विमा आणि जनरल इंश्युरन्स प्रोडक्ट विक्रीसाठी IRDAI कडून तत्त्वतः मान्यता मिळाली आहे. कंपनीने म्हटले होते की, यामुळे आता आम्ही 30 कोटीहून अधिक यूजर्सना विमा संबंधित सल्ला देऊ शकतो. IRDAI ने फोनपेला विमा ब्रोकिंग परवाना दिला आहे. आता PhonePe भारतातील सर्व विमा कंपन्यांची विमा उत्पादने विकू शकते.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here