अक्कलकोट,दि.24: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील बुधवार पेठेतील श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समाधी मठाला सोमवारी सकाळी 10 वाजता भेट देऊन श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. सरसंचालक मोहन भागवत यांच्या आगमना निमित्ताने शहरात तसेच श्री समाधी मठ परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
त्यांच्या आगमन पार्श्वभूमीवर सनई चौघडा टाळ मृदंगाच्या निनादात ब्रह्मवृंदांच्या हस्ते मठाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मंत्र उपचारात औक्षण करण्यात आले. मोहन भागवत यांनी
मठातील श्रीच्या पादुकांचे पूजन करून आशीर्वाद घेतले. श्री मठाकडून पुजारी परिवार यांच्यावतीने भागवत यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी श्री मठाकडून राबविण्यात येत असलेल्या लोकउपयोगी उपक्रमाची माहिती त्यांनी जाणून घेतली. या उपक्रमाचे मोहन भागवत यांनी कौतुक केले. मोहन भागवत हे मठात असेपर्यंत प्रवेश बंद ठेवण्यात आला होता. उपविभागीय पोलिस अधिकारी विलास यामावार, पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
यावेळी श्री चोळप्पा महाराज यांचे वंशज अन्नु महाराज पुजारी, केदार महाराज, धनंजय महाराज, महेश महाराज, सुरेश महाराज, सुधाकर महाराज आदि उपस्थित होते.