MNS Vs BJP: मनसेची एक सही संतापाची तर भाजपची एक सही भविष्यासाठी मोहीम

0

मुंबई,दि.१७: MNS Vs BJP: मनसेची एक सही संतापाची मोहीम महाराष्ट्रात सुरू आहे. राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. राज्यातील राजकारणाचा जनतेला कंटाळा आला आहे. एक सही संतापाची या मोहिमेतंर्गत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राज्यभरात आंदोलन उभारलं. राज्यातील राजकीय उलथापालथीवर संताप व्यक्त करण्यासाठी मनसेने जनतेला आव्हान केले. स्वत: राज ठाकरेंनी दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे या आंदोलनात सहभाग घेतला. आता मनसेच्या या आंदोलनाला उत्तर देण्यासाठी भाजपानेही एक सही भविष्यासाठी ही मोहिम हाती घेतली आहे.

MNS Vs BJP | मनसेची एक सही संतापाची तर भाजपची एक सही भविष्यासाठी मोहीम

याबाबत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, जेव्हा अन्य पक्ष राजकारणापुरते राजकारण करतात. एकमेकांवर कुरघोडी, शिव्याशाप इतके राजकारण करतात. त्यात उद्धव ठाकरे, काँग्रेस-राष्ट्रवादी, मनसे हे जनहितापेक्षा राजकीय हितासाठी काम करतायेत पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार तरुणांच्या भविष्यासाठी काम करतायेत याचा आम्हाला गर्व आहे म्हणून एक सही भविष्यासाठी या अभियानातंर्गत शहरातील सर्व कॉलेजमध्ये ही मोहिम राबवण्यात येईल असं त्यांनी सांगितले.

त्याचसोबत ऐतिहासिक कार्य नरेंद्र मोदी यांनी केले. आर्थिक राजधानीत मुंबईत IIM संस्था उभारतेय. मुंबईतील नागरिक, तरुणांना बाहेर जाण्याची गरज पडणार नाही. ही वर्षोनुवर्षे मागणी होतेय. दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना न्याय देण्याचे काम मोदी सरकार करतेय. पदवीधर, वैद्यकीय संस्थेतील जागा वाढवल्या. ३९ टक्के विद्यापीठ वाढवले एकप्रकारे भारताचे भवितव्य उज्ज्वल करण्याचे काम मोदी सरकार करतय असं शेलारांनी म्हटलं.

दरम्यान, आम्ही कोणालाही उत्तर देत नाही. मनसेचे अभियान राजकीय आणि आमचे अभियान विद्यार्थ्यांच्या भविष्याचे. त्यांचा संताप मनसेला मत न मिळण्याचा आणि आमची सेवा देशाच्या भवितव्यासाठी आहे अशा शब्दात भाजपाच्या आशिष शेलार यांनी मनसेला टोला लगावला. तसेच अधिवेशनातून काय मिळणार या राज ठाकरेंच्या उत्तरावरही शेलार यांनी ज्याने त्याने प्रतिक्रिया देताना कुठल्या भाषेचा वापर करावा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी आणि माझा पक्ष अशा भाषेचा वापर करणार नाही असं म्हटलं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here