राज ठाकरेंच्या ठाण्यातल्या बहुचर्चित सभेचा टीझर मनसेकडून प्रदर्शित

0

दि.10: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्याला शिवाजी पार्कवर सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. राज ठाकरे यांनी मशिदिवरील भोंगे काढावे लागतील नाहीतर आम्ही लाऊड स्पीकरवर हनुमान चालीसा लावू असा इशारा दिला होता. धर्म निर्माण झाला तेंव्हा भोंगे होते का? असा प्रश्न राज यांनी उपस्थित केला होता. यावर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar),शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut), शरद पवार (Sharad Pawar) आदींनी राज ठाकरे यांच्यावर टिका केली होती.

या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा सुरू असतानाच आता ठाण्यात होणाऱ्या राज ठाकरेंच्या बहुचर्चित सभेचा टीझर मनसेना प्रदर्शित केला आहे. ठाण्यात १२ एप्रिलला होणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचा टीझर मनसेकडून रिलीज करण्यात आला आहे. गुढीपाडव्याच्या सभेमध्ये राज ठाकरेंच्या भाषणावरील राजकीय प्रतिक्रियांना या सभेतून उत्तर दिलं जाणार आहे. राज ठाकरेंच्या १२ एप्रिलला पार पडणाऱ्या सभेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. देशपांडे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये शरद पवार, संजय राऊत आणि अजित पवार यांनी केलेल्या टीका आहेत. या सर्व टीकांवर राज ठाकरे ठाण्याच्या सभेत उत्तर देणार आहे. या सर्व टीकांना राज ठाकरे ‘करारा जवाब’ देणार असे म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणावर अजूनही चर्चा सुरु आहे. त्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे, मदरशांमधले गैरप्रकार यावर भाष्य केलं होतं.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here