बसवेश्वर बेडगे/सोलापूर,दि.12: मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी X वर व्यंगचित्र शेअर केले आहे. नुकताच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्र प्रकरणावर निकाल दिला आहे. नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना आहे असा निकाल दिला आहे. नार्वेकर यांनी शिंदे गटाचे आमदार अपात्र केले नाहीत.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या पक्षाशी युती केल्यामुळे अनेकदा ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली. शरद पवार शिवसेना पक्ष संपवतील असे अनेकदा बोलले जाते. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फूट पडली. शरद पवार यांचे राजकीय डावपेच भल्याभल्यांना कळत नाहीत.
मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी शेअर केलेल्या व्यंगचित्रात उध्दव ठाकरे आणि शरद पवार दिसत आहेत. उध्वस्त शब्दातील ध्व अक्षराच्या ऐवजी उध्दव ठाकरे हे शरद पवारांना मिठी मारलेले दाखवण्यात आले आहे. व्यंगचित्र काढणाऱ्याला उध्दव ठाकरे हे शरद पवारांमुळे उध्वस्त झाले असे दर्शवायचे आहे.
शालिनी ठाकरे काय म्हणाल्या?
केवढी प्रचंड कल्पनाशक्ती असते व्यंग चित्रकारांची…. इथे “व” ला कळून चुकलय… “ध” अर्धवट आहे… अगतिक आहे… लाचार आहे… बेबस है….. आपला आधार नसेल तर तो संपल्यातच जमा आहे… पण त्याला तरी या “ध” ला कुठे टिकवायचा आहे… म्हणून त्याने हात दिलेला नाहीये… पोटाला लटकणारा हा “ध” पुरता लटकलाय याची “व”ला कल्पना आहे… पण “ध” ला लटकवताना “व” देखील लटकला…. कारण कर्म… “ध्व” एवढा कधीच समजला नव्हता… आज हे समजावून सांगणाऱ्या व्यंगचित्रकाराला सलाम! शाबास!! अशी पोस्ट शालिनी ठाकरे यांनी X वर शेअर केली आहे. यापोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
 
            
