mns banner: महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री…

0

मुंबई,दि.22: mns banner: मराठी नववर्ष आणि गुढीपाडवा (Gudi Padwa) राज्यभर साजरा होत आहे. गुढीपाडव्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात आज मनसेचा (MNS) पाडवा मेळावा पार पडणार आहे.. त्यानिमित्त शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून बॅनरबाजी करण्यात आलीये. महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील भावी मुख्यमंत्री राज ठाकरे अशा आशयाचे बॅनर लावण्यात आलेत शिवसेना भवनासमोर बॅनर लावून मनसेने ठाकरे गटाला डिवचण्याचा प्रयत्न केलाय. दादर उपशाखाध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले आहेत. या बॅनरबाजीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगलेली पाहायला मिळत आहे.

राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा |mns banner

दरम्यान, आज संध्याकाळी राज ठाकरेंची शिवाजी पार्कवर सभा होणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानात धडाडणार आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कमध्ये पार पडणार आहे. या मेळाव्याची सध्या जय्यत तयारी सुरु आहे. या मेळाव्याचा टीझर जारी करण्यात आला होता. याआधी 9 मार्च रोजी मनसेच्या वर्धापनदिनी झालेल्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी सविस्तर राजकीय भाष्य करणं टाळलं होतं. पण आज गुढीपाडव्याच्या मेळाव्यात आपण सविस्तर राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आजच्या मेळाव्यात राज ठाकरे कुणाकुणावर निशाणा साधणार याकडे राजकीय निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे. शिवसेनेतल्या ऐतिहासिक बंडाच्या पार्श्वभूमीवरही राज ठाकरे काही भाष्य करतात का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं आहे.

सौदीत मशिदीवरील भोंगे बंद होतात मग

दरम्यान उद्याच्या सभेआधी राज ठाकरेंनी दिलेल्या एका मुलाखतीत मशिदीवरील भोंग्यांवरुन सरकारला सवाल केला आहे. सौदीत मशिदीवरील भोंगे बंद होतात मग महाराष्ट्रात भोंगे बंद का होत नाही असं राज ठाकरे म्हणाले. लोकमान्य सेवासंघ, पारले शतकपूर्ती सोहळ्यात आज राज ठाकरेंची मुलाखत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते या मुलाखतीत वर्तमानपत्र काढण्याची इच्छा असल्याचंही ते म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here