MLC Election Result 2022: राष्ट्रवादी आणि भाजप केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागणार

0

मुंबई,दि.20: MLC Election Result 2022: राष्ट्रवादीच्या रामराजेंच्या कोट्यातील एक मत तर भाजपच्या उमा खापरेंच्या कोट्यातील एक मत बाद करण्यात आलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक एक मत बाद ठरवण्यात आल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी आता उमेदवाराला 25.71 चा नवा कोटा निश्चित करण्यात आला आहे.

मतमोजणी पुन्हा थांबली; मत बाद केल्याप्रकरणी भाजप केंद्रीय आयोगाकडे दाद मागणार
रामराजे निंबाळकर आणि उमा खापरे यांचे मत बाद केल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने यावर आक्षेप घेतला असून, भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार करत धाव घेतली आहे.

महाराष्ट्रात (Maharashtra) विधान परिषदेच्या (Vidhan Parishad) 10 जागांसाठी मतदान झाले. शिवसेनेकडून सचिन अहीर, आमशा पाडवी रिंगणात आहेत. तर भाजपाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उपा खापरे आणि प्रसाद लाड असे पाच उमेदवार उमेदवारांनी निवडणूक लढवली. राष्ट्रवादी काँग्रेसनं रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना तिकीट दिलं होत. तर काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांना उमेदवारी दिली होती.

विधानपरिषदेच्या मतमोजणीमध्ये आता दोन्ही बाजू आक्रमक झाल्या असून दोन्ही बाजूंकडून प्रत्येक मतावर आक्षेप घेण्यात येतोय. त्यामुळे मतमोजणीला विलंब होत असल्याचं दिसून येतंय.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here