मुंबई,दि.20: MLC Election Result: राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची निवडणूक आज झाली, असून दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की राज्यसभा निवडणुकीप्रमाणे भाजपा चमत्कार घडवणार याबाबत प्रचंड उत्कंठा लागली आहे. विधान परिषद निवडणुकीचा पहिला निकाल हाती आला असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि भाजपचे राम शिंदे (Ram Shinde) यांचा विजय झाल्याचे सांगितले जात आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर, उमा खापरे, श्रीकांत भारतीय यांचा विजय झाला आहे. राष्ट्रवादीच्या रामराजेंच्या कोट्यातील एक मत तर भाजपच्या उमा खापरेंच्या कोट्यातील एक मत बाद करण्यात आलं आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे एक एक मत बाद ठरवण्यात आल्यानंतर विधान परिषद निवडणुकीत विजयी होण्यासाठी आता उमेदवाराला 25.71 चा नवा कोटा निश्चित करण्यात आला आहे.