MLA Yogesh Kadam Accident: मुंबई-गोवा महामार्गावर आमदार योगेश कदम यांच्या वाहनाला भीषण अपघात

0

मुंबई,दि.7: शिंदे गटाचे (Shinde Group) आमदार योगेश कदम (MLA Yogesh Kadam Accident) यांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आहे. योगेश कदम हे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांचे सुपुत्र आहेत. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Goa National Highway) पोलादपूरजवळ हा अपघात घडला. या अपघातात आमदार योगेश कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. तर आमदार कदम सुदैवाने बचावले असून त्यांना किरकोळ मार लागल्याची माहिती मिळत आहे. आमदार कदम मुंबईकडे जात होते, याचवेळी त्यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. (MLA Yogesh Kadam Car Accident)

कोण आहेत आमदार योगेश कदम? | MLA Yogesh Kadam Accident

आमदार योगेश कदम हे माजी मंत्री व शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे सुपूत्र आहेत. ते दापोली मतदारसंघाचे आमदार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, योगेश कदम मुंबईच्या दिशेनं जात असताना मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर पोलादपूरजवळ एका भरधाव डंपरने त्यांच्या वाहनाला धडक दिली. या अपघातात कदम यांच्या वाहनाचा चक्काचूर झाला आहे.

सर्वजण सुखरूप | MLA Yogesh Kadam Car Accident

सुदैवाने आमदार योगेश कदम अपघातानंतर सुखरूप असल्याची माहिती मिळाली आहे. त्यांच्या चालकाला (Driver) मात्र किरकोळ दुखापत झालीये. अपघातानंतर चोळई येथील शासकीय रूग्णालयात (Hospital) उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

कदम यांच्या चालकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. भरधाव वेगातील टँकरने आमदार कदम यांच्या गाडीला धडक दिली. मुंबईकडे येत असताना अपघात झाला. अपघातानंतर टँकर पलटी झाला आणि चालक पळून गेला. आमदार कदम यांच्या गाडीला धडक बसल्यानंतर टँकर पोलिसांच्या गाडीला धडकला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here