भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या घराजवळ बॅनरबाजी 

0

सोलापूर,दि.१८: भाजपचे आमदार सुभाष देशमुख (MLA Subhash Deshmukh) यांच्या घराजवळ बॅनरबाजी करण्यात आली आहे. आमदार सुभाष देशमुख यांच्या घराजवळ ‘व्यक्ती हरली,पार्टी जिंकली!’ अशा आशयाचा बॅनर लावला आहे. होटगी रोड दैनिक संचारसमोर आमदार देशमुख यांचे निवासस्थान आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला ८७ जागा मिळाल्या आहेत. १०२ जागांवर भाजपने उमेदवार उभे केले होते. आमदार देशमुख यांच्या घरापासून काही अंतरावर बॅनरबाजी करण्यात आली होती. मात्र नंतर हे बॅनर हटवण्यात आले आहे.

सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे तसेच आमदार सचिन कलियाणशेट्टी हे महापालिका निवडणुकीत शेवटपर्यंत सक्रिय राहिले होते. आमदार सुभाष देशमुख यांचा विरोध डावलून भाजपने माजी आमदार दिलीप माने यांना पक्षप्रवेश दिला होता. महापालिका निवडणूक प्रचारात आमदार सुभाष देशमुख सक्रिय नव्हते. त्यांनी प्रचारात सहभाग घेतला नव्हता. आमदार विजयकुमार देशमुख हेही गोरे, कोठे आणि कल्याणशेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर नाराज होते. 

आमदार सुभाष देशमुख यांनी आम्ही दोन्ही आमदार देशमुखांनी मागील वेळी महापालिका निवडणुकीत ४९ जागा निवडून आणल्या होत्या. आता तर दोन आमदार पालकमंत्री अशी मोठी माणसे आहेत त्यामुळे यावेळी जागा वाढतील अशी उपरोधिक प्रतिक्रिया दिली होती. 

पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्याशिवाय महापालिकेत एकहाती सत्ता मिळवून दिली आहे, असे तर या बॅनरमधून सुचित करायचे नसेल ना?  सोशल मिडीयावर बॅनर व्हायरल झाला आहे. शहरात अनेक ठिकाणी अशाप्रकारचा बॅनर लावण्यात आले आहेत.

सोशल मिडीया व्हायरल मजकूर

व्यक्ती हरली,पार्टी जिंकली!

सोलापुरात आ. सुभाष देशमुख यांच्या घराजवळ बॅनरबाजी

सोलापूर महापालिका निवडणुकीत पक्षाला यश मिळाले असले तरी प्रचार यंत्रणेत शेवटपर्यंत आ. सुभाष देशमुख सहभागी न झाल्याचा राग काही कार्यकर्त्यांनी उघडपणे व्यक्त केला. याच नाराजीचे प्रतीक म्हणून आमदारांच्या घराजवळ बॅनर लावण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here