हिंगोली,दि.१५: शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष संतोष बांगर यांनी उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली आहे. संतोष बांगर हे शिवसेने बरोबर होते. बंडखोर आमदारांविरुद्ध त्यांनी आक्रमकपणे टीका केली होती. मात्र त्यांनी परत शिंदे गटात प्रवेश केला. संतोष बांगर यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याचं कौतुक केल्यामुळे मतदारसंघातही त्यांची वाहवा होत आहे. कोरोना काळात आपली एफडी मोडून रेमडिसीवीर इंजेक्शनची पूर्तता केल्यामुळेही ते कार्यकर्त्यांमध्ये लक्षवेधी ठरले होते. तर, आपल्या विधानांमुळेचही ते चर्चेत असतात. आता, आमदार बांगर यांनी चक्क एका व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावल्याने पुन्हा व्हायरल झाले आहेत.
शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी कामगारांसाठी सरकारने सुरू केलेल्या मध्यान्ह भोजन योजनेतील भ्रष्टाचारावरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. मध्यान्ह भोजन योजनेतून कामगारांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. एका उपहारगृहाची पाहणी करायला गेलेल्या आमदार बांगर यांचा निकृष्ट दर्जामुळे पारा चांगलाच चढला. संतप्त झालेल्या आमदारांनी या उपहारगृह व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याचे आवाहन केलं आहे.